आज आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत, Goa मध्ये फसवणूक (Scams) कशाप्रकारे होते?
Table of Contents
गोवा हे भारतातील महाराष्ट्र आणि कर्नाटक मधील किनारपट्टीचे राज्य आहे. गोवा हे देशातील सर्वात लहान राज्य आहे.गोव्याची राजधानी पणजी आहे.गोवा हे भारतातील लोकांना आकर्षण वाटेल असेच पर्यटन स्थळ आहे. दरवर्षी मोठ्या संख्येने पर्यटक गोव्याला भेट देतात. हे एक अद्भुत राज्य आहे जिथे लोक अनेक कारणासाठी येतात अनेक संस्कृती येथे मिसळतात, त्यामुळे ते इतके आकर्षक बनते.
गोव्यात पोर्तुगीज, हिंदू, इस्लामिक, फ्रेंच अशा विविध संस्कृती पाहायला मिळतात. येथे अनेक प्रकारचे समुद्रकिनारे पाहायला मिळतात काही समुद्रकिनाऱ्यावर रात्रीच्या वेळी पार्टीला जाता येते. गोव्यात डॉल्फिन शो देखील असतात आणि ते पाहण्यासाठी पर्यटक बोटीतून समुद्रात जातात.
अशा विविधपूर्ण गोष्टींनी समृद्ध असलेल्या गोव्यामध्ये आपल्या नकळत जर आपली फसवणूक होत असेल तर? याचा आपण कधी विचार पण केलेला नसतो. पण गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांसोबत फसवणुकीचे प्रकार (Scam) होत असतात.
1. Scooty And Cars Rental Scam –
पर्यटक ज्यावेळेस गोव्यामध्ये पर्यटनासाठी जातात तेव्हा ते त्यांच्या सोयीसाठी आणि त्यांना हवे तिथे फिरण्यासाठी स्कुटी किंवा कॅब भाडे तत्त्वावर बुक करतात. पण त्या स्कुटी आणि कॅबना (legal Permission) कायदेशीर परवानगी घेतलेली असणे आवश्यक आहे.
गोव्यात पर्यटकांना खाजगी वाहने ऑफर केली जातात त्यांच्याकडे कायदेशीर परवानगी नसते. ते त्यांच्या खाजगी रजिस्ट्रेशनच्या सहाय्याने वाहने ऑफर करतात जे की बेकायदेशीर आहे.
कायद्यानुसार फक्त बाईक्स आणि कॅब (Bikes and Cab) यासारखीच वाहने भाडेतत्त्वावरती देण्यास मान्यता आहे आणि अशा वाहनांवरती पिवळ्या कलरची नंबर प्लेट असणे गरजेचे आहे. पांढऱ्या रंगाची नंबर प्लेट असणाऱ्या वाहनाला पर्यटनासाठी भाड्याने देण्यास कायदेशीर मान्यता नाही.
तुम्ही जेव्हा दुचाकी भाडेतत्त्वावरती घेता तेव्हा हेल्मेटची (Helmet) मागणी नक्की करा, कारण गोवा सरकारने हेल्मेट घालणं सक्तीचे केले आहे. फसवणूक करणारे (Scammer) तुम्हाला सांगतील हेल्मेट नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही बिनधास्त बाईक चालवा पण ते चुकीचे आणि बेकायदेशीर आहे. तुम्ही जेव्हा गोव्यात पर्यटनासाठी जाणार असाल तेव्हा हे नक्की लक्षात ठेवा खाजगी वाहने (Private Vehicles) घ्याल तर पोलीस पकडतील.
2. Tatoo Scam –
गोवा म्हटले की फॅशनेबल Tatoo काढणे तर आलेच. मग गोव्यामध्ये अनेक लोक हौस म्हणून टेम्पररी टॅटू (Temporary Tatoo) काढण्याला प्राधान्य देतात. टॅटू काढणारे तुमच्याकडे येतात आणि सांगतात टेम्प्रेरी टॅटू काढून घ्या,फक्त आणि फक्त 50 रुपये/इंच. आपण पण लगेच तयार होतो. मग टॅटू काढणारे टॅटू काढायला सुरुवात करतात समजा त्याने 6 इंच टॅटू काढला तर तो त्याचे पैसे 1800 रुपये सांगतो. तुम्हालाही फार आश्चर्य वाटेल, तुम्ही बोलता 50 रूपये/इंच अस आपलं बोलणं झालं होतं मग 1800 रूपये एवढे कसे काय? त्यावर टॅटू काढणारा बोलतो आपल्यामध्ये 50 रुपये /Square इंच असं बोलणं झालं होतं. आता बघा 6 इंच tatoo म्हणजे 6×6=36 म्हणजे 36×50=1800 आणि मग तुम्हाला जेवढे पैसे मागतात तेवढे त्यांना द्यावे लागतात.
अशा प्रकारची फसवणुक जास्त करून Goa मध्ये Baga Beach, Calangute beach, आणि Candolim Beach वरती मोठ्या प्रमाणात होत आहे.
3. Ear Wax Scam –
गोव्यामध्ये कान साफ करून फसवणूक करणारे खूप असतात. ते पहिल्यांदा तुम्हाला विचारतात, तुम्ही तुमचा कान साफ करून घेणार आहात का? तुम्ही हो बोललात तर मग ते लाईट च्या साह्याने कान बघतात, चेक करतात आणि बोलतात तुमच्या कानामध्ये खूप जास्त घाण आहे. आपण घाबरून जातो आणि आपण बोलतो खरंच?? मग ते स्वतः हातचलाखीने इयर वॅक्स (Ear Wax) कानात घालतात. ते आपल्याला कळत देखील नाही आणि दिसत पण नाही. मग ते हळूहळू इयर वॅक्स बाहेर काढतात आणि तुमची फसवणूक करतात. आपण त्यांना पैसे पण देतो अशा प्रकारे तुमची फसवणूक होते. अशा प्रकारचे Scam भारतात खूप ठिकाणी होतात त्यामधील मुंबईच्या जुहू बीच वरती आणि दिल्लीमध्ये कॅनोल्ट प्लेस या ठिकाणी अशा प्रकारचे Scam चे प्रमाण जास्त आहे.
4. Elephant Photo Scam –
Goa मध्ये Candolim आणि Calangute या रस्त्यावर तुम्हाला नेहमी हत्ती वरती बसलेले साधू दिसतील. त्यांनी अगदी साधू सारखाच पोशाख परिधान केलेला असतो त्यामुळे बघणाऱ्यांचा विश्वास बसतो की ते साधूच आहेत. तुम्ही तेथे फोटो काढण्यासाठी जाता आणि ते साधू तुम्हाला अनेक खोट्या गोष्टी सांगतात तुम्ही हत्ती वरती बसून फोटो काढला तर तुमची आजपर्यंतची सर्व पापे नष्ट होतील, सर्व पापे धुतली जातील. तूम्ही खुश होता आणि तुमचाही त्यावरती पटकन विश्वास बसतो. तुम्ही फोटो काढायला तयार होतात आणि फोटो काढल्यानंतर ते तुमच्याकडून खूप जास्त पैशाची मागणी करतात अशा प्रकारे तुमची फसवणूक होते तुम्हाला कधी गोव्यामध्ये गेल्यानंतर अशा प्रकारचे साधू दिसले तर तुम्ही त्यांच्या फसवणुकीला बळी न पडता तुमचा मार्ग बदला.
5.Helpful Taxi Driver Scam-
आपण कोणत्याही नवीन ठिकाणी गेलो तर आपल्याला काहीच माहित नसेल तर उदाहरणार्थ जेवण कोठे छान मिळते? राहण्यासाठी कोणते हॉटेल चांगले आहे? अशा प्रकारची माहिती ट्रॅक्सी ड्रायव्हरला (Taxi Driver) आपण विचारतो आणि तेथेच आपण चुकतो कारण हे टॅक्सी Driver हॉटेल मालकांकडून कमिशन घेतात आणि ते त्या ठराविक हॉटेल चे नाव तुम्हाला सांगतात आणि तुमच्याकडून त्या हॉटेलमध्येही जास्त पैसे घेतले जातात पण पैसे जास्त जाऊन ते हॉटेल चांगले असेलच असं नाही. हॉटेलमधील जेवण चांगले असेलच असं नाही अशा प्रकारचे Scam गोव्यात सर्रास होत आहेत जर तुम्ही गोव्याला फिरायला जात असाल तर या गोष्टींचा विचार नक्की करा म्हणजे तुमची फसवणूक होणार नाही.
Goa Scam बद्दल ही महत्त्वाची माहिती तुम्हाला कशी वाटली Comment मध्ये नक्की सांगा. हा ब्लॉग तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा त्यामुळे गोव्यामध्ये गेल्यानंतर त्यांच्या सोबत हा Scam होणार नाही. अशा अधिक महत्त्वपूर्ण माहितीसाठी आमच्या उजव्या बाजूला दिलेल्या चिन्हावरती क्लिक करून आमचा मराठी Marathi pride.Com हा ग्रुप जॉईन करा.