Thursday, May 9, 2024
spot_img
More

    “Healthy Habits: 7 Foods to Avoid in Monsoon” – पावसाळ्यात हे सात पदार्थ खाणे टाळा अन्यथा आजारांना निमंत्रण मिळेल

    पावसाळ्यात हे सात पदार्थ खाणे टाळा अन्यथा आजारांना निमंत्रण मिळेल – Never eat this 7 foods in Monsoon Season

    पावसाळ्यात आपल्याला नेहमीच चांगले चुंगले पदार्थ खाऊ वाटतात. परंतु असे काही पदार्थ आहेत जे तुम्ही या ऋतूमध्ये खाणे टाळले पाहिजेत कारण ते तुमच्या आरोग्याला बाधा आणू शकतात. मान्सून हा कडक उन्हाळ्यापासून काहीसा दिलासा देतो, परंतु हा ऋतू अनेक आरोग्यविषयक समस्यांचाही आहे. त्यामुळे, जर तुम्ही तुमच्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीबद्दल जागरूक आणि सावध राहाल तरच ते फायद्याचे आहे. त्यासाठी तुम्हाला तुमच्या रोजच्या खाण्याच्या सवयी (Healthy Habits) मध्ये ऋतू प्रमाणे बदल करणे गरजेचे आहे.

    1. हिरव्या पालेभाज्या (Green Leafy Vegetables)

    Green Leafy Vegetables
    "Healthy Habits: 7 Foods to Avoid in Monsoon" - पावसाळ्यात हे सात पदार्थ खाणे टाळा अन्यथा आजारांना निमंत्रण मिळेल 7

    पावसाळ्यात पालक, मेथी,चंदनबटवा,लाल माठ,चाकवत, कोबी,फ्लॉवर अशा पाले भाज्या खाणं शक्यतो टाळावे. पावसाळ्यात पालेभाज्या न खाण्यामागे काही वैज्ञानिक कारणे आहेत. पावसाळ्यात छोटे-छोटे विषाणू आणि जंतू जे आपल्याला डोळ्यांनी दिसत देखील नाहीत ते उघड्यावर ठेवल्या जाणाऱ्या पालेभाज्यांना चिकटून राहू शकतात.कधीकधी उत्पादक सुद्धा पालेभाज्या या किटाणू आणि जंतू पासून निर्जंतुक करण्यासाठी त्यावर हानिकारक कीटकनाशकांचा वापर करतात.त्यामुळे साहजिकच तुम्ही अशा भाज्या खाल्ल्या तर शरीराला मोठे नुकसान होऊ शकते.

    2. वांगे (Brinjal)

    Brinjal
    "Healthy Habits: 7 Foods to Avoid in Monsoon" - पावसाळ्यात हे सात पदार्थ खाणे टाळा अन्यथा आजारांना निमंत्रण मिळेल 8

    अनेक ठिकाणी वांगे हे श्रावण महिन्यात भगवान शंकराला प्रसाद म्हणून चढवतात.पावसाळ्यात अनेक जण याची भाजी खाणे पसंत करतात पण मुळात पावसाळ्यात वांग्यापासून लांबच राहावे पावसाळ्यात वांग्यात अनेक छोटे-छोटे किडे पाहायला सुरुवात होते हे किडे पोट दुखी आणि अनेक समस्यांना आमंत्रण देऊ शकतात म्हणूनच जाणकार सुद्धा सांगतात की वांगी कापल्यावर त्यात थोडा जरी रंगाचा फरक दिसला किंवा डाग दिसला तरी ते वांगे खाऊ नये शक्य असल्यास संपूर्ण पावसाळा वांगे खाणे टाळनेच योग्य आहे.

    3. दूध आणि दुधाचे पदार्थ (Avoid Milk and Dairy products)

    Dairy Foods
    "Healthy Habits: 7 Foods to Avoid in Monsoon" - पावसाळ्यात हे सात पदार्थ खाणे टाळा अन्यथा आजारांना निमंत्रण मिळेल 9

    पावसाळ्यात दूध,दही,पनीर,ताक,लस्सी असे डेअरी प्रोडक्टस (Dairy products)खाऊ नयेत असा सल्ला दिला जातो.पावसाळी हवेत पचनक्रिया मंदावते, त्यामुळे हे पदार्थ लवकर पचत नाहीत.तसंच कफाचा त्रासही होऊ शकतो त्यामुळे पावसाळ्यात दुधाचे पदार्थ खाऊ नयेत असं सांगितलं जातं.दूध प्यायचं असेल तर चांगले उकळून कोमट करून आणि त्यात हळद घालून मगच प्या.

    4. तळलेले आणि रस्त्यावरचे पदार्थ (Fried And Street food)

    Street Foods
    "Healthy Habits: 7 Foods to Avoid in Monsoon" - पावसाळ्यात हे सात पदार्थ खाणे टाळा अन्यथा आजारांना निमंत्रण मिळेल 10

    तळलेले आणि रस्त्यावरचे उघडे पदार्थ खाणे टाळावे हे तर आपण शाळेपासून ऐकत आलोय आणि आपण या गोष्टीचे पालन केलेच पाहिजे कारण पावसाळ्यात डास, माश्या,जंतू विषाणू आणि किटाणू यांचा सुळसुळाट जास्त असतो. हे जंतू खाण्यासोबत तुमच्या पोटात जाऊ शकतात उदाहरणार्थ आपण पाणीपुरीकडे पाहूया पाणीपुरी मध्ये वापरलेले पाणी खराब असल्यास तुम्हाला अतिसार,डायरिया, उलट्या होणे यासारखे भयंकर आजार होऊ शकतात त्यामुळे पावसाळ्यात या पदार्थापासून लांबच राहावे.

    5. मांस आणि मासे,(Non-veg and Fish)

    Chicken and fish
    "Healthy Habits: 7 Foods to Avoid in Monsoon" - पावसाळ्यात हे सात पदार्थ खाणे टाळा अन्यथा आजारांना निमंत्रण मिळेल 11

    मांस आणि माशांचे सेवन सुद्धा पावसाळ्यात न करण्याचा सल्ला दिला जातो.श्रावण महिन्यात आपण जो उपवास करतो त्या मागचे मुख्य कारण हेच आहे आपण धार्मिक कारणाने उपवास करतो पण त्या मागचे शास्त्रातील तर्क शुद्ध कारण हेच आहे की या काळात पावसाळा असतो आणि मांस व मच्छी दोन्हीवर विषाणू आणि जंतूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असतो म्हणून अशा दूषित मांस व मच्छीचे सेवन करणे हानीकारक ठरू शकते त्यामुळे पावसाळ्यात मांसाहार पूर्णपणे टाळावा.

    6. कच्चे किंवा कमी शिजवलेले अन्नRaw and Under cooked Food

    कच्चे अन्न खाल्ल्याने तुम्हाला जंतूचा जास्त संपर्क होऊ शकतो ते तुमच्या आरोग्याला हानिकारक ठरू शकते अन्न शिजवल्याने बॅक्टेरिया नष्ट होतात. म्हणून व्यवस्थित शिजलेल्या अन्नाचेच सेवन करणे फायद्याचे ठरते.

    7. दही(Curd)

    Curd
    "Healthy Habits: 7 Foods to Avoid in Monsoon" - पावसाळ्यात हे सात पदार्थ खाणे टाळा अन्यथा आजारांना निमंत्रण मिळेल 12

    दही प्रोबायोटिक आहे आणि म्हणूनच प्रत्येकाने त्याचा आहारात समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.मात्र योग्य वेळी ते खाणे गरजेचे आहे.दह्यात कुलिंग इफेक्ट असतो आणि म्हणूनच पावसाळ्यात रात्रीच्या आहारात दही खाणे आरोग्यासाठी चांगले असते.पण विशेषतः ज्या लोकांना आधीच सायनोसायटीस चा त्रास आहे त्यांनी दही अजिबात खाऊ नये कारण कोणतीही सर्दी सायनोसायटीस खराब करते आणि रात्री दही किंवा ताक खाल्ल्यामुळे पावसाळयात सर्दी खोकला वाढवू शकतो.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Latest Posts

    spot_imgspot_img

    Don't Miss

    Stay in touch

    To be updated with all the latest news, offers and special announcements.