Saturday, May 25, 2024
spot_img
More

  How the Stand-Up India Scheme is Empowering Entrepreneurs – स्टँड-अप इंडिया योजना उद्योजकांना कशी सक्षम बनवत आहे

  Stand Up India Scheme – स्टॅन्ड-अप इंडिया स्कीम

  आपण पाहतो आजकाल ची तरुण पिढी तसेच महिला वर्ग सुद्धा नोकरी करण्यापेक्षा स्वतःचा बिझनेस चालू करण्याकडे त्यांचा कल वाढताना दिसत आहे. ते योग्य सुद्धा आहे, कारण आपल्या नोकरीसाठी किती वेळ दिला तरी तो कमीच पडतो, आणि शिवाय कंपनीला कितीही प्रॉफिट झाला तरी त्याचा आपल्याला काहीच फायदा होत नाही आपल्याला आपला पगार (Salary) आहे तेवढाच आपल्याला मिळतो. मग तेच जर आपल्या स्वतःच्या बिझनेससाठी पळत असाल तर आपल्याला त्याचा चांगलाच फायदा होईल. आज काल आपण पाहतोच बरेच इंजिनियर ,डॉक्टर झालेली मुले सुद्धा स्वतःचा चहाचा, वडापाव असे अनेक प्रकारचे बिजनेस करत आहेत आणि त्यामध्ये ते सक्सेस पण होत आहेत. आज कालच्या पिढीमध्ये महिला सुद्धा कोणताही बिझनेस करण्यासाठी तयार असतात पण बिझनेस करायचा असेल तर मुख्य प्रश्न उभा राहतो तो भांडवल!!भांडवल कुठून आणणार ? कारण सध्या बाजारात अशा खूप बँक आहेत ज्या की लोन देतात पण लोन घेणे प्रत्येकालाच परवडणारे असते असे नाही कारण या बँकांचा Rate of Interest खूपच जास्त आहे. सुरुवातीला बिझनेस च्या ग्रोविंग स्टेजला इतका अवाढव्य रेट ऑफ इंटरेस्ट देणे परवडणारेच नसते अशा आर्थिक अडचणीमुळे आपली तरुण पिढी आहे तो 9 ते 6 जॉब करायला प्राधान्य देतात. म्हणून आपल्या मोदी सरकारने तरुण पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि महिला च्या व्यावसायिक वृत्तीला वाव देण्यासाठी Stand Up India ही योजना चालू केली आहे.

  Stand Up India Loan ही योजना नेमकी काय आहे-

  महिला उद्योजकांना चालना देण्यासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्टँड अप इंडिया योजना (Stand Up India Scheme) सुरू केली आहे .

  लाभार्थ्यांना आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.

  1. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि जमाती तसेच महिला कर्जदारांना बँक कर्ज दिले जाते. ही बँक कर्जाची रक्कम 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत आहे.
  2. या योजनेअंतर्गत महिला उद्योजकांना उद्योग उभारणे, कर्ज मिळवणे आणि वेळोवेळी आवश्यक असेल ते सहकार्य मिळवणे सोपे होईल. या व्यतिरिक्त या योजनेद्वारे रोजगार निर्मिती होईल त्यामुळे बेरोजगारांचे प्रमाण कमी होईल.
  हे सुद्धा वाचा

  Stand Up India Loan Scheme फायदे आणि वैशिष्ट्ये –

  1. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती आणि जमाती तसेच महिला कर्जदारांना बँक कर्ज दिले जाते ही बँक कर्जची रक्कम 10 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंत आहे.
  2. या योजनेच्या मदतीने किमान एक अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती कर्जदार आणि प्रत्येक बँकांच्या शाखेत किमान एक महिला कर्जदाराला ग्रीन फील्ड एंटरप्राइज सुरू करण्यासाठी कर्ज दिले जाईल.
  3. हा उपक्रम उत्पादन सेवा उद्योगात कृषी संलग्न व्यवसाय किंवा व्यापार क्षेत्र किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज मिळू शकते.
  4. जर इंटरप्राईज वैयक्तिक नसेल तर किमान 51% शेअर होल्डिंग आणि कंट्रोलिंग स्टेक SC किंवा ST महिला उद्योजकांकडे असणे आवश्यक आहे.
  5. या योजनेअंतर्गत मुदत कर्ज आणि खेळते भांडवल यासह प्रकल्प खर्चाच्या 85 टक्के संमिश्र कर्ज प्रदान केले जाईल. या योजनेसाठी लागू होणारा व्याजदर हा बँकेचा सर्वात कमी व्याजदर लागू केला जाईल (बेस रेट MCLR + 3%)+ मुदत प्रीमियम.
  6. प्राथमिक सुरक्षे व्यतिरिक्त बँकेने ठरवल्यानुसार Stand Up India Loan Scheme कर्जासाठी क्रेडिट गॅरंटी फंड योजनेच्या हमीद्वारे कर्ज सुरक्षित केले जाऊ शकते.
  7. कर्जाची परतफेड 7 वर्षांत 18 महिन्यांच्या कमाल स्थगित (Moratorium) कालावधीसह आहे

  स्टँड अप इंडिया कर्ज योजनेची पात्रता-

  1. अर्जदार हा भारताचा कायमचा रहिवाशी असणे आवश्यक आहे.
  2. अर्जदार एससी किंवा एसटी किंवा महिला उद्योजक असणे आवश्यक आहे.
  3. अर्जदाराचे वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे.
  4. कर्जदार कोणत्याही बँकेचा किंवा वित्तीय संस्थेचा डिफॉल्टर नसावा.

  आवश्यक कागदपत्रे-

  1. आधार कार्ड
  2. जातीचा दाखला
  3. रहिवाशी दाखला
  4. वयाचा दाखला
  5. पासपोर्ट साईज फोटो
  6. मोबाईल नंबर
  7. कर्ज फॉर्म

  Stand Up India Loan Scheme या योजनेअंतर्गत कर्जासाठी अर्ज कसा करायचा-

  सर्वप्रथम स्टॅंडर्ड इंडिया कर्ज योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर होम पेजवर जा.

  होम पेजवर गेल्यानंतर कर्ज मिळविण्यासाठी अर्ज करा वरती क्लिक करा.

  1. या पेजवर तुम्हाला तुमची श्रेणी निवडावी लागेल. त्यानंतर तुम्हाला तुमचे नाव, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर टाकावा लागेल.
  2. आता तुम्हाला जनरेट ओटीपी वर क्लिक करावे लागेल नंतर तुम्हाला ओटीपी टाकावा लागेल.
  3. तुम्हाला रजिस्टर वर क्लिक करुन लॉगिन करावे लागेल. नंतर तुम्ही स्टँड अप इंडिया लोन स्कीम पर्यायावर क्लिक करा अर्ज तुमच्या समोर येईल अर्जामध्ये तुम्हाला आवश्यक ती सर्व माहिती भरा. त्यासाठी तुम्हाला आवश्यक ती कागदपत्रे द्यावी लागतील त्यानंतर Submit वर क्लिक करा.

  स्टँड-अप इंडिया आणि स्टार्ट-अप इंडिया योजनांमधील फरक – Differences Between Start-up India and Stand-up India Schemes

  स्टँड-अप इंडिया योजना अल्पसंख्याक गट (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती) आणि महिला उद्योजकांना व्यवसायाच्या संधी प्रदान करते. दुसरीकडे, स्टार्ट-अप इंडिया अशा कंपन्यांना व्यवसायाच्या संधी प्रदान करते ज्या स्टार्ट-अपच्या श्रेणीत येतात आणि पुरेसा महसूल मिळवू शकत नाहीत.

  अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या official स्टॅन्ड अप इंडियाच्या लिंक वर क्लिक करा

  https://www.standupmitra.in/Home/SUISchemes

  तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला ते Comment मध्ये नक्की सांगा. अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आमचा उजव्या बाजुला दिलेल्या चिन्हावरती क्लिक करून आमचा Marathipride.Com या व्हॉट्सॲप ग्रुपला जॉईन करा.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Latest Posts

  spot_imgspot_img

  Don't Miss

  Stay in touch

  To be updated with all the latest news, offers and special announcements.