Friday, May 10, 2024
spot_img
More

    Which 5 Super healthy foods we should take in our daily breakfast? सकाळच्या नाश्त्यामध्ये या पाच पदार्थांचा समावेश करा आणि निरोगी रहा.

    आपला सकाळचा नाश्ता कसा असतो यावरती आपला पूर्ण दिवस आधारित असतो.

    आपली आजकालची तरुण पिढी Diet च्या नावाखाली सकाळचा नाश्ता करतच नाहीत आणि ते आपल्यासाठी घातक आहे वजन कमी करण्यासाठी नाश्ता न करणे हा योग्य पर्याय नाही.

    आपला सकाळचा नाश्ता कमी प्रमाणात असेल तरी हरकत नाही पण तो नाश्ता पौष्टिक, प्रोटीन युक्त असा हवा जेणेकरून आपल्याला दिवसभराच्या धावपळीत,धकाधकीच्या जीवनात खूपच energetic आणि उत्साही राहता आले पाहिजे.

    तुम्हाला दिवसभर थकल्यासारखे अशक्तपणा आल्यासारखे वाटत असेल तर तुम्हाला तुमच्या नाष्टा मध्ये काय खाता यावरती लक्ष देणे गरजेचे आहे.

    त्यासाठी आम्ही तुम्हाला नाश्त्यासाठी आज असे काही पदार्थ सांगणार आहोत जेणेकरून ते तुम्हाला दिवसभर फ्रेश उत्साही आणि एनर्जेटिक ठेवतील.

    1. शेंगदाणे – Peanuts

    Peanuts
    Which 5 Super healthy foods we should take in our daily breakfast? सकाळच्या नाश्त्यामध्ये या पाच पदार्थांचा समावेश करा आणि निरोगी रहा. 6

    शेंगदाणे हा सर्रास सगळ्या घरात उपलब्ध असणारा असा पदार्थ आहे पण आपल्याला अजूनही शेंगदाणे आपल्या शरीरासाठी किती फायदेशीर आहेत हे ठाऊक नसेल,तज्ञांच्या मते शेंगदाण्यात 25 टक्क्याहून अधिक Proteins असतात. 250 ग्रॅम शेंगदाण्यात जितके Proteins आणि Vitamins असतात तितके 250 ग्रॅम मांसाहार मध्येही मिळत नाहीत.

    एखादी व्यक्ती नियमितपणे शेंगदाणे खात असेल तर त्यांच्या शरीराला आवश्यक असणारे दूध आणि तूप यांचे पोषण मिळते त्यामुळे दररोज नाश्त्यामध्ये शेंगदाणे खाल्लेच पाहिजेत.

    2. अंडी – Eggs

    Eggs
    Which 5 Super healthy foods we should take in our daily breakfast? सकाळच्या नाश्त्यामध्ये या पाच पदार्थांचा समावेश करा आणि निरोगी रहा. 7

    अंड्यामध्ये मुबलक प्रमाणात Vitamin D आढळते जे तुमच्या हाडांना बळकटी देण्यास फायदेशीर ठरते.अंड्यामध्ये कॅलरीज,Proteins, कॅल्शियम,फॉस्फरस,सेलेनियम, Vitamins यासारखे पोषक घटक आढळतात.

    नाश्त्यामध्ये अंड्याचे सेवन केल्यास त्वचा आणि डोळ्यांच्या सभोवतालच्या सुरकुत्या कमी होतात त्यामुळे त्वचा बऱ्याच काळापर्यंत तजेलदार राहते.

    3. मोसंबी – संत्री – Oranges

    Oranges
    Which 5 Super healthy foods we should take in our daily breakfast? सकाळच्या नाश्त्यामध्ये या पाच पदार्थांचा समावेश करा आणि निरोगी रहा. 8

    मोसंबी आणि संत्री यामध्ये Vitamin C मोठ्या प्रमाणात आढळते जे शरीरात रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आणि रोगांशी लढायला मदत करते. आता सध्याच्या काळात बऱ्याच वेळा डॉक्टर रोगप्रतिकारशक्ती चांगली ठेवण्यासाठी मोसंबी खाण्याचा सल्ला देतात. मोसंबीचे सेवन केल्यास Blood Pressure नियंत्रित राहण्यास मदत होते आणि मोसंबी शरीर डिटॉक्सिफाय करते त्यामुळे आपल्या शरीरातील विषारी द्रव्य बाहेर पडण्यास मदत होते.

    4. कोमट पाणी – Warm Water

    Warm Water
    Which 5 Super healthy foods we should take in our daily breakfast? सकाळच्या नाश्त्यामध्ये या पाच पदार्थांचा समावेश करा आणि निरोगी रहा. 9

    आपण उन्हाळा असो किंवा हिवाळा कोमट पाण्याचे सेवन करणे आपल्या शरीरासाठी फायद्याचे ठरते. दर दिवशी प्रत्येकाने अडीच ते तीन लिटर पाणी प्यायले पाहिजे.
    कोमट पाण्यामध्ये मध मिक्स करून पिल्याने तुमची पचन क्रिया सुधारते.कॉन्स्टिपेशन(constipation) होत असल्यास त्यापासून मुक्ती मिळते. कोमट पाण्यामुळे आपल्या शरीरातील प्रतिकार शक्ती बळकट होते.
    सर्दी खोकला असेल तर नक्कीच कोमट पाणी पिणे फायद्याचे ठरते तसेच सकाळी उठल्यानंतर दोन ग्लास कोमट पाणी पिल्याने पित्ताचा त्रास कमी होतो.

    5. बदाम – Almond

    Almonds
    Which 5 Super healthy foods we should take in our daily breakfast? सकाळच्या नाश्त्यामध्ये या पाच पदार्थांचा समावेश करा आणि निरोगी रहा. 10

    बदामा मध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते त्यामुळे मूठभर बदाम खाल्ल्यास वजन वाढण्याचा धोका वाढत नाही. बदाम आपल्या शरीराची Metabolism टिकवून ठेवतात जे आपल्या शरीराचे वजन कमी करण्यास आणि वजन नियंत्रित करण्यासाठी महत्त्वाचे आहे.
    दररोज आपल्या नाष्ट्यामध्ये बदामाचे सेवन करून Type 2 Diabetes चा धोका टाळता येतो.
    तुम्ही रात्री बदाम भिजत घालून सकाळी उठल्यानंतर त्याचे साल काढून देखील खाऊ शकता.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Latest Posts

    spot_imgspot_img

    Don't Miss

    Stay in touch

    To be updated with all the latest news, offers and special announcements.