Tuesday, July 9, 2024
spot_img
More

  What’s Changing Your CIBIL Score ? Know Reasons – तुमचा CIBIL Score कशामुळे बदलत आहे ? जाणून घ्या प्रमुख कारणे

  तुमचा CIBIL Score कशामुळे बदलत आहे ? जाणून घ्या प्रमुख कारणे

  आपण ज्या जगात राहतो ते जग अतिशय वेगवान असं जग आहे. या जगात आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक जण आपल्या परीने धडपडत असतो. आपल्या सर्वांनाच असे वाटते की, आपले एक चांगले घर असावे, कार असावी पण यासारख्या गोष्टी खूप कमी लोकांना कॅश मध्ये घेणे शक्य होते. जे सर्वसामान्य नागरिक आहेत, त्यांना आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी Bank Loan चा आधार घ्यावा लागतो. आजकाल मार्केटमध्ये अशा खूप बँक आहेत ज्या लोकांना Car Loan,Bank Loan देऊन त्यांची स्वप्न पूर्ण करण्यास मदत करतात. पण हे बँक लोन घेवून आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला तुमचा CIBIL SCORE चांगला असणे गरजेचे आहे. तुमचा सिबिल स्कोर जितका जास्त चांगला असेल तितकं तुम्हाला बँकेकडून कमी व्याजदर मिळण्यास मदत होईल.

  चला तर मग आपण या ब्लॉगमध्ये आज पाहणार आहोत,

  • CIBIL SCORE म्हणजे काय?
  • CIBIL SCORE चे फायदे तोटे काय आहेत?
  • आपला CIBIL स्कोर कसा वाढवायचा?

  CIBIL SCORE म्हणजे काय?

  CIBIL SCORE म्हणजे ही 3 अंकी संख्या आहे. जी एखाद्या व्यक्तीची क्रेडिट पात्रता दर्शवते. सिबिल स्कोर हा 300 ते 900 पर्यंत असतो. जितका जास्त सिबिल स्कोर असेल तितकी क्रेडिट पात्रता चांगली असे म्हणता येईल. जर तुमचा सिबिल स्कोर 700 प्लस असेल तर तुम्हाला बँक लोन घेण्यासाठी काहीच अडचणी येणार नाहीत. सिबिल स्कोर जितका चांगला असेल तितकी कर्ज मंजुरी आणि कमी व्याजदर अशा अनेक गोष्टींच्या संधी उपलब्ध होतात. या संधीचा फायदा करून घ्यायचा असेल तर तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर वाढवणे आवश्यक आहे.

  CIBIL SCORE चे फायदे तोटे काय आहेत?

  आपल्याला जर बँकेकडून एखादे लोन घ्यायचे असेल तर ते लोन घेण्यासाठी आपल्याला आपला CIBIL स्कोर चांगले असणे गरजेचे आहे. सिबिल स्कोर चांगला असल्याचा फायदा म्हणजे आपल्याला कर्ज मंजुरी आणि कमी व्याजदर या संधीचा फायदा घेता येतो. तसेच जर CIBIL स्कोर खराब असेल तर आपल्याला कर्ज घेण्यासाठी अनेक अडचणी येऊ शकतात.

  CIBIL SCORE कसा वाढवायचा?

  1. तुमचा पाया कसा आहे यापासून सुरुवात करा.

  ज्याप्रमाणे एक मजबूत संरचना तयार करण्यासाठी भक्कम पाया असणे आवश्यक असतो. तसेच एक मजबूत आर्थिक पाया स्थापन करण्यासाठी तुमचा CIBIL SCORE चांगला असणे गरजेचे आहे. तुम्ही तुमची बिले आणि कर्जाचे EMI वेळेवर भरत आहात याची खात्री करा. तुमचा पेमेंट इतिहास तुमची क्रेडिट पात्रता ठरवण्यास महत्त्वाची भूमिका बजावते आणि वेळेवर दिलेले कर्जाचे हप्ते जबाबदार कर्जदार असण्याची तुमची पात्रता दर्शवतात.

  2. क्रेडिट विविधता स्वीकारा

  क्रेडिटचा जबाबदारीने वापर करणे अत्यावश्यक असले तरी अनेक प्रकारचे Credits म्हणजे Credit cards,Home Loan आणि Personal Loan यांसारखी अनेक कर्जाचे EMI तुम्ही वेळेवर भरत आहात तर तुम्ही अनेक प्रकारच्या कर्जाचे व्यवस्थापन प्रभावीपणे करत आहात आणि याचा सकारात्मक परिणाम तुमच्या CIBIL स्कोर वरती होईल आणि तुमचा CIBIL स्कोर वाढवण्यास मदत होईल.

  3. Credit Utilization तपासा

  क्रेडिट युटीलायझेशन म्हणजे तुमची क्रेडिट कार्डची मर्यादा किती आहे आणि तुम्ही क्रेडिट कार्डचा केलेला वापर. जास्त क्रेडिट कार्डचा वापर तुमच्या स्कोर वर नकारात्मक परिणाम करू शकतो.शक्यतो क्रेडिट कार्डचा वापर कमीत कमी करा कारण तुमचा क्रेडिट कार्डचा वापर जास्त असेल तर तुम्ही तुमचे आर्थिक खर्च जास्त वाढवत आहात असा त्याचा अर्थ होतो.

  4. जुनी खाती बंद करण्यापूर्वी विचार करा

  जुनी क्रेडिट खाती बंद करणे ही एक चांगली कल्पना आहे असे जरी वाटत असेल तरी, त्यामुळे तुमचा CIBIL स्कोर खराब होऊ शकतो. जुनी खाती दीर्घ क्रेडिट इतिहास दर्शवतात, त्यामूळे जुने खाती बंद करण्याऐवजी अधून मधून लहान व्यवहारासह सक्रिय ठेवण्याचा विचार करा.

  5. वारंवार क्रेडिट अर्ज टाळा

  तुम्ही अल्प कालावधीत अनेक क्रेडिट चौकशी करत असाल तर ते तुमच्या CIBIL स्कोर साठी चांगले नाही.त्यामुळे त्याचा तुमच्या CIBIL स्कोर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. जेव्हा आवश्यक असेल तेव्हाच क्रेडिट साठी अर्ज करा आणि एकाच वेळी खूप जास्त कर्ज घेण्याबाबत सावधगिरी बाळगा.

  तुमचा CIBIL SCORE वाढवणे हा एक आयुष्यातील महत्त्वाचा टप्पा आहे. यासाठी क्रेडिट व्यवस्थापनातील बारकावे समजून घेण्यासाठी शिस्त, आर्थिक जागरूकता आवश्यक आहे. मजबूत आर्थिक पाया तयार करणे, क्रेडिटचे वैविध्य आणणे, क्रेडिट युटीलायझेशन व्यवस्थापित करणे. तुमच्या क्रेडिट अहवालाबाबत जागरूक राहणे यावर लक्ष केंद्रित करून तुम्ही तुमचा CIBIL स्कोर वाढवू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा हे फक्त संख्या बद्दल मर्यादित नाही तर हे एक जबाबदार आर्थिक पद्धती स्वीकारण्याबद्दल आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवण्यासाठी तसेच आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी, स्वतःला सक्षम बनवण्याबद्दल आहे.हा प्रवास तुमच्या आर्थिक भविष्य सुधारून जीवन अधिक सुखकर, सर्व सोयी सुविधा युक्त करण्यासाठी आहे.

  तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते Comment मध्ये नक्की सांगा. हा ब्लॉग तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा. अशाच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या चिन्हावरती क्लिक करून आमचा Marathi pride.com हा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Latest Posts

  spot_imgspot_img

  Don't Miss

  Stay in touch

  To be updated with all the latest news, offers and special announcements.