Friday, May 10, 2024
spot_img
More

    Maha Nondani App – मोबाईल वरून करा आता ऊसाची नोंद

    Maha Nondani App – ऊसाची नोंद करणे झाले खूप सोप्प

    ऊस हे शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळवून देणारे नगदी पीक आहे.शेतकऱ्यांसाठी ऊस हे जागतिक पातळीवर महत्त्वाचे पीक मानले जाते. कारण ऊस उत्पादनात जेवढी जास्त वाढ होईल तेवढी शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती सुधारायला मदत होते.
    ग्रामीण भागात उसाची शेती मुळे अनेक लोकांना रोजगार उपलब्ध होतात.
    ऊस उत्पादन वाढीसाठी शेतकरी नेहमीच प्रयत्नशील असतो आणि त्याच्या प्रयत्नांना यश तेव्हाच येते जेव्हा कारखान्यांकडे ऊस नोंदणी वेळेवर होऊन ऊसतोड येते. मात्र एवढे सगळे कष्ट करून जेव्हा ऊस कारखान्यांना पाठवायची वेळ येते तेव्हा येणारी सर्वात मोठी अडचण म्हणजे “ऊस नोंदणी”(Oos Nondani).

    खूप कष्ट करून चांगले उसाचे उत्पन्न आणले तरीही शेतकऱ्यांना स्वतःची ऊस नोंदणी करण्यासाठी अनेकांच्या मागे लागावे लागते. ऊस नोंदणी साठी कारखान्यांच्या फेऱ्या माराव्या लागतात.ऊस नोंदणी वेळेवर न झाल्यामुळे ऊसतोड वेळेत येत नाही आणि उसाची तोडणी वेळेत नाही झाली तर उसाचे हाता तोंडाशी आलेले चांगले उत्पन्न घटते.

    मग अशा परिस्थितीत ग्रामीण भागातून अनेक तक्रारी येतात. आणि शेतकऱ्यांच्या मध्ये नाराजीचे वातावरण तयार होते.
    म्हणूनच या सगळ्या अडचणींचा विचार करून सरकारने महा ऊस नोंदणी ॲप (Maha-Us Nondani App)तयार केले आहे.

    शेतकऱ्यांना या App चा उपयोग होणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या ब्लॉगमध्ये आम्ही सांगणार आहोत.

    Maha Nondani App – महा नोंदणी ॲप चे फायदे- Benefits Of Maha-Us Nondani App-

    • 1. ऊस नोंदणी करताना शेतकऱ्यांची जी काही गैरसोय होत होती ती आता या ॲप च्या माध्यमातून होणार नाही.
    • 2. शेतकऱ्यांना घरबसल्या ऊस नोंदणी करता येणार.
    • 3. या ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना एक किंवा त्यापेक्षा जास्त कारखाने निवडता येतील.
    • 4. शेतकऱ्यांना एकापेक्षा जास्त कारखाने निवडण्याचा पर्याय असल्यामुळे त्यांना वेळीच ऊस तोडणीची खात्री मिळेल.
    • 5. ऊस नोंदणी वेळेत झाल्यामुळे ऊस तोड वेळेत होवून शेतकऱ्यांच्या ऊस उत्पादनात वाढ होईल.

    तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला Comment मध्ये नक्की सांगा. ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या सर्व मित्र परिवारासोबत शेअर करा जेणकरून त्यांनाही नक्कीच याचा लाभ घेता येईल. आम्ही आमच्या पुढच्या ब्लॉगमध्ये “ऊस तोडणी यंत्र अनुदान योजनेबद्दल” माहिती सांगणार आहोत. अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी खाली उजव्या बाजूला दिलेल्या व्हाट्सअप चिन्हा वरती क्लिक करून आमचा Marathipride.com हा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

    सर्वसमावेशक पीक विमा योजना

    महा ऊस नोंदणी ॲप चा वापर कसा करायचा?

    How to use Maha- Nondani App?

    नोंदणी सुरु करण्यापूर्वी आपल्या शेताबाबत ई पीक पाहणी या अँपमधील कार्यवाही पूर्ण करावी

    • 1. महा ऊस नोंदणी ॲप डाऊनलोड(Maha Nondani App Download)करण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवरून PlayStore मध्ये जाऊन महा उस नोंदणी ॲप Install करावे लागेल.
    • 2. महा ऊस नोंदणी ॲप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला विचारलेल्या काही बेसिक गोष्टींची माहिती द्यावी लागेल, त्यामध्ये तुम्हाला तुमचे गाव,तालुका,जिल्हा याबद्दल माहिती द्यावी लागेल.
    • 3. तुमच्या शेतामध्ये ऊस क्षेत्र किती आहे?आणि त्याचे गट क्रमांक काय आहेत?याबद्दल माहिती भरावी लागेल.
    • 4. नंतर शेतकऱ्याचे पूर्ण नाव,मोबाईल नंबर,आधार नंबर टाकावा लागेल.
    • 5. त्यामध्ये ऊस कारखाना निवडण्याचा पर्याय येईल यामध्ये तुम्ही एकूण तीन कारखाने निवडू शकता.
    • 6. वरील सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला सगळ्यात शेवटी धन्यवाद असा मेसेज दिसेल.
    • 7. तुम्ही महा ऊस नोंदणी ॲप मध्ये ऊस नोंदणी केल्यानंतर संबंधित आयुक्तालय मार्फत ही ऊस नोंदणी पुढे कारखान्यांकडे पाठवण्यात येईल.
    • 8.तुम्ही निवडलेले संबंधित कारखाने तुमच्या सोबत संपर्क साधतील.

    Maha-Nondani App च्या माध्यमातून राज्यातील जवळपास 100 खासगी आणि 100 सहकारी असे एकूण 200 कारखान्यांच्या कडे ऊस नोंदणीची माहिती साखर आयुक्तालय पाठवेल.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Latest Posts

    spot_imgspot_img

    Don't Miss

    Stay in touch

    To be updated with all the latest news, offers and special announcements.