Smart Phone वापरताय मग तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी!!
आज कालचे जग हे फारच जास्त सोयी सुविधा युक्त झाले आहे. या सोयीचा वापर जितका जास्त होतो तितकं आपलं आयुष्य अधिक सोपं होत चालले आहे. आजकाल आपण सगळीकडेच पाहतो Smart Phone चा जमाना आहे. स्मार्टफोनमुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत, पण या Smart Phone चा अतिवापर घातक देखील ठरत आहे. कोरोनाच्या काळात ऑनलाईन लेक्चरच्या निमित्ताने मुलांना पालक स्मार्टफोन वापरण्यासाठी परवानगी देत होते, पण त्याचा अतिवापर मुलांच्यासाठी धोक्याचा आहे हे अनेक संशोधनात सिद्ध देखील झाले आहे.
तर आज आम्ही तुम्हाला या ब्लॉगमध्ये अशाच काही स्मार्टफोन बद्दल महत्वाची माहिती सांगणार आहोत. जर तुम्ही पण Android Smart phone वापरत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. कारण Google कडून स्मार्टफोनसाठी अँड्रॉइड सपोर्ट बंद करण्यात आला आहे.म्हणजे तुमचा फोन एक प्रकारे जंक होईल, कारण त्या फोनमध्ये तुम्हाला कोणतेही App वापरता येणार नाही किंवा तुम्ही वापरत असलेले ॲप सुरक्षित राहणार नाहीत. आता प्रश्न उद्भवतो की कोणत्या फोनसाठी Android Support बंद होणार? google कडून Android 4.4 KitKat साठी Android सपोर्ट बंद केला जात आहे.
कोणते स्मार्टफोन खराब होतील?
1 10 वर्षे जुन्या स्मार्टफोनवर Google काम करणे बंद करणार आहे.गुगल सपोर्ट 1 ऑगस्ट पासून देशभरात प्रभावी होणार आहे. तुमचा Smart Phone 10 वर्ष जुना असेल तर तो खराब होईल.
2 2013 मध्ये Android Kitkat लॉन्च झाले होते म्हणजेच तुमचा स्मार्टफोन Kitkat किंवा आधीच्या Android आवृत्तीवर आधारित असेल तर त्याचा सपोर्ट बंद केला जाईल.
3 Google च्या अहवालानुसार सध्या फक्त 1% Android Smart Phone आणि टॅबलेट हे Android Kitkat प्रणालीवर आधारित आहेत. या स्मार्टफोन ला Google Play Store मिळणार नाही.
Operating System सुरक्षित राहणार का?
Google Play Support बंद केल्यामुळे ऑपरेटिंग सिस्टीम पूर्णपणे काम करणे थांबवेल. याचाच अर्थ फोन वापराच्या दृष्टीने सुरक्षित राहणार नाही.
अशा परिस्थितीत तुम्ही काय केले पाहिजे?
1. 10 वर्ष जुने Smart Phone सुरक्षित राहणार नाहीत. हे आपल्याला लक्षात आले आहे, त्यामुळे अशा परिस्थितीत आपल्या स्मार्टफोन वर कोणत्याही प्रकारची वैयक्तिक माहिती (Personal Details,Bank Details) ठेवू नका.
2. जर तुम्हाला शक्य होत असेल तर, तुमचा Smart Phone Replace करा.
तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला Comment मध्ये नक्की सांगा. ही महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा.अशाच माहितीसाठी खाली दिलेल्या चिन्हावरती क्लिक करून आमचाMarathipride.Com हा what’s app ग्रुप जॉईन करा.