लेक लाडकी या योजनेअंतर्गत मुलींना 75 हजार रुपये राज्य शासनाकडून मिळणार आहेत.
पहा मित्रांनो मुलींच्या सक्षमी करणासाठी योजना आता नव्या स्वरूपात आणली आहे यामध्ये
- √ मुलींचा जन्म झाल्यानंतर त्या मुलीला पाच हजार रुपये मिळणार
- √ पहिलीत असताना चार हजार
- √ सहावीत असताना सहा हजार
- √ अकरावीत गेल्यानंतर आठ हजार मिळणार
- √ ती मुलगी 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रुपये राज्य शासनाकडून मिळणार. तर अशा प्रकारे ही रक्कम मुलींना तिच्या वाढत्या वयानुसार मिळणार आहे.
या लेक लाडकी योजनेसाठी कोणत्या मुली पात्र असणार आहेत.
√लाभार्थी मुलगी महाराष्ट्र राज्यातील रहिवाशी असावी.
√ या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी मुलीच्या कुटुंबातील रेशनकार्ड पिवळ्या किंवा केशरी रंगाचा असावा.
√ फक्त दुर्बल वंचित घटकातील लाभार्थी मुलींनाच या योजनेचा लाभ देण्यात येईल.
√ 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी शासनाकडील 75 हजार रुपये मिळवायचे असल्यास, सर्व शैक्षणिक कागदपत्रं असणे अनिवार्य आहे.
लेक लाडकी योजना अर्ज कसा करावा?
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्प सादर करताना या योजनेची माहिती दिली; परंतु अद्याप या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा अधिकृत पोर्टल अथवा वेबसाईट सुरू करण्यात आलेली नाही. अर्ज करण्यासाठी वेबसाईट अथवा ऑफलाईन अर्जाची पद्धत सुरू झाल्यानंतर आमच्या वेबसाईटवरती याची माहिती देण्यात येईल.