सर्वसमावेशक पीक विमा योजना – Comprehensive Crop Insurance
आपल्या देशाचे शेतकरी आपल्यासाठी दिवस रात्र राबून आपल्या सर्वांसाठी धान्य,भाजीपाला यांचे उत्पादन करतात. वर्षानुवर्षी राबणाऱ्या या शेतकऱ्यांना कधीच निवांतपना, आराम माहीतच नसतो. वर्षभर आपले भारतातील शेतकरी मशागत,पेरणी,पिकांची कापणी करण्यात व्यस्त असतात म्हणूनच शेतकऱ्यांचे आयुष्य खूपच व्यस्त आणि खडतर आहे. वर्षानुवर्ष आपल्यासाठी राबणाऱ्या या शेतकऱ्याला “उभ्या जगाचा पोशिंदा”असं म्हटलं जातं.
कधीकाळी पूर,दुष्काळ यासारखी संकटे तर कधी कीड, कीटकनाशके यामुळे पिकांचे नुकसान देखील होते मग अशावेळी आपला शेतकरी बांधव करणार काय?
म्हणूनच या शेतकऱ्यांच्या हितासाठी आपले राज्य सरकार नेहमीच काही ना काहीतरी नवीन योजना काढत असतात आणि त्याचा फायदा आपल्या शेतकऱ्यांना होतो देखील. म्हणूनच सरकारने एक नवीन योजना काढली आहे या योजनेअंतर्गत एक रुपयात शेतकऱ्यांचा पीक विमा काढण्यात येणार आहे आणि या योजनेचे नाव “सर्वसमावेशक पीक विमा योजना” असे नाव आहे.
ही योजना नेमकी काय आहे हे आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरावा लागणार शेतकऱ्यांच्या हिश्याची बाकी रक्कम राज्य शासन भरणार आहे.
विमा घेण्यासाठी शेतकरी पिक विमा पोर्टल,सामुदायिक सुविधा केंद्र किंवा बँकेत शेतकरी आपला अर्ज सादर करू शकतील.
या योजनेअंतर्गत फक्त एक रुपया मध्ये दोन लाख रुपयांचा विमा देते. एक रुपये विम्याच्या आधारावर बारा रुपयांच्या वार्षिक प्रीमियम वर दरमहा एक रुपये कव्हरची ऑफर मिळते. ही रक्कम तुमच्या लिंक केलेल्या Bank Account मधून प्रत्येक महिन्याला कापली जाते या अंतर्गत दोन लाख रुपयांचे कव्हर उपलब्ध आहे.
कोणत्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार?
1.शेतकऱ्यांची पेरणी ते पीक काढणीपर्यंतचे कोणत्याही प्रकारचे नुकसान झाल्यास त्या नुकसान भरपाईस विमा घेणारे शेतकरी पात्र राहतील.
2.त्याचबरोबर नैसर्गिक आपत्ती (Natural Disasters) उदा. पूर,दुष्काळ,गारपीट,पावसाची अनियमितता, कीड-कीटकनाशके यामुळे होणारे पिकांचे नुकसान तसेच, काढणीनंतरचे नुकसान या सर्व कारणासाठी शेतकऱ्यांना पीक नुकसानीची भरपाई मिळणार आहे.
योजनेत सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख खरीप पिकांसाठी कोणती आहे ?
३१ जुलै २०२३ आहे
पीक विमासाठी अर्ज कण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा
या योजनेसंबंधी कोणतीही माहिती हवी असल्यास Comment मध्ये नक्की सांगा.ही महत्वपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा.अशाच नवीन महत्त्वपूर्ण माहितीसाठी खाली दिलेल्या व्हाट्सअप चिन्हा वरती जाऊन आमचा
marathipride.com हा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.