Tuesday, September 10, 2024
spot_img
More

    Wireless Emergency Alerts: A Lifeline for Public Safety – सार्वजनिक सुरक्षिततेसाठी जीवनरेखा –

    Wireless Emergency Alerts: A Lifeline for Public Safety – सार्वजनिक सुरक्षिततेसाठी जीवनरेखा

    आज सकाळी आपण सगळे नेहमीप्रमाणे आपल्या कामाच्या घाईत होतो. कोण ऑफिसमध्ये बिझी होते तर कोणाचं अजूनही Work From Home चालू असेल.गृहिणी घरातल्या कामात व्यस्त होत्या आणि अशातच सकाळी 10.30 सुमारास अचानक सगळ्यांचे फोन वाजू लागले. फोनवरती काहीतरी Error आल्यासारखा मेसेज आला. हा मेसेज आल्यानंतर बऱ्याच जणांची खूपच तारांबळ उडाली. ज्यांना याबद्दल काहीच माहित नाही ते घाबरले सुद्धा त्यांना असे वाटले की आपल्याच मोबाईल मध्ये काहीतरी बिघाड आहे त्यामुळे अनेकांनी मोबाईल रिस्टार्ट सुद्धा केले पण या मेसेजचा नेमका काय अर्थ आहे हे आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत.

    तुमच्याही मोबाईल वरती अशा प्रकारचा Wireless Emergency Alert (वायरलेस इमर्जन्सी अलर्ट) आला आहे का?हा Wireless Emergency Alert तुमच्या मोबाईलवर देखील आला असेल तर घाबरून किंवा गोंधळून जाण्याची गरज नाही आम्ही या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे सांगणार आहोत जेणेकरून तुम्हाला(Wireless Emergency Alert) वायरलेस इमर्जन्सी अलर्ट बद्दल ची सर्व माहिती कळेल.

    Wireless Emergency Alerts म्हणजे काय?

    Wireless Emergency Alert ही भारत सरकारने तयार केलेली एक अशी system आहे जी आपत्कालीन परिस्थिती येण्यापूर्वीच्या तयारीचा एक महत्त्वाचा भाग आहे. Wireless Emergency Alert सिस्टीमचा आपल्याला धोकादायक हवामान, भूकंप, चक्रीवादळ, हरवलेली मुले, आणि इतर अचानक उद्भवणाऱ्या गंभीर परिस्थितीबद्दल लोकांना आधीच सूचना देण्यासाठी उपयोग केला जाऊ शकतो.

    Wireless Emergency Alert ही एक सार्वजनिक सुरक्षा प्रणाली आहे. जी नागरिकांना त्यांच्या क्षेत्रातील धोक्यांचा इशारा देणारी एक सिस्टीम आहे. वायरलेस कंपन्या वायरलेस इमर्जन्सी अलर्ट मध्ये सहभागी होण्यासाठी स्वयंसेवक आहेत, जे सार्वजनिक सुरक्षितता वाढवण्यासाठी व्यवस्थापन करतात.

    Wireless Emergency Alerts कसे कार्य करते?

    अधिकृत राष्ट्रीय, राज्य किंवा स्थानिक सरकारी अधिकारी वायरलेस इमर्जन्सी अलर्ट वापरून सार्वजनिक सुरक्षितता आणि आणिबाणी – जसे की गंभीर हवामान, भूकंप, चक्रीवादळ, हरवलेली मुले किंवा अडकलेली मुले बाहेर काढण्याची गरज असेल तेव्हा अशा संबंधित सूचना पाठवू शकतात. अधिकृत सार्वजनिक सुरक्षा अधिकारी Integrated Public Alert And Warning System (IPAWS) द्वारे सहभागी वायरलेस वाहकांना वायरलेस इमर्जन्सी अलर्ट(Wireless Emergency Alert) पाठवतात जे नंतर प्रभावित क्षेत्रातील सुसंगत मोबाईल डिवाइसेस (Mobile Devices)वर अलर्ट पाठवतात.

    Wireless Emergency Alerts ची इतर नावे आहेत का?

    या System ला Wireless Emergency Alert असेच म्हंटले जाते. परंतु या नवीन सार्वजनिक सुरक्षा प्रणालीचे अधिकृत नाव कमर्शियल मोबाईल अलर्ट सिस्टीम (CMAS)आहे. काही एजन्सी Personal Localised Alert Network (PLAN) नाव देखील वापरू शकतात.

    जेव्हा तुम्हाला कोणाला हा मेसेज प्राप्त होतो तेव्हा काय करायचे?

    मेसेज मध्ये सांगितलेल्या कोणत्याही कृतीचे अनुसरण करा. त्या संबंधित अधिक माहितीसाठी स्थानिक मीडियाकडून अधिक तपशील मिळतोय का ते बघा.तुम्हाला अधिक माहितीची गरज असेल तर तुम्ही वायरलेस इमर्जन्सी अलर्टला तसं अपडेट करू शकता.

    हे सुद्धा वाचा

    हा Emergency Alerts प्राप्त करण्यासाठी तुमच्याकडून काही शुल्क आकारले जाणार का?

    नाही..मोबाईल नेटवर्क कंपनी तुम्हाला कोणत्याही शुल्काशिवाय वायरलेस आपत्कालीन सूचना प्रदान करते.

    Wireless Emergency Alerts तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे का?

    योग्यवेळी मिळालेल्या सूचना तुम्हाला आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित ठेवण्यास मदत करू शकतात. तुमच्याकडे वायरलेस इमर्जन्सी अलर्ट हे चालू केले नसेल तर आपत्कालीन परिस्थितीत तुमच्या जीवाला धोका असू शकतो.

    Wireless Emergency Alerts आणि Regular MSG यामधील फरक कसा ओळखायचा?

    WEA आल्यानंतर एक विशिष्ट प्रकारची tone आणि Vibration जाणवते. ही Tone आणि Vibration सलग 2 वेळा Repeat होते.

    Wireless Emergency Alerts जारी करण्यासाठी कोण सांगते?

    केंद्र सरकार, राज्य सरकार आणि स्थानिक सार्वजनिक अधिकारांच्या समन्वयाने WEA आपत्कालीन सूचना पाठवते.

    आपत्कालीन काळात नेटवर्क प्रॉब्लेम मुळे तुम्ही Call किंवा Message करु शकत नाही तेंव्हा तूम्ही WEA प्राप्त करू शकता का?

    होय.. तूम्ही WEA प्राप्त करू शकता. नेटवर्क प्रॉब्लेम चा Wireless Emergency Alert वरती काहीच परिणाम होत नाही.

    तुमच्या फोनमध्ये Wireless Emergency Alerts सूचना कशी चालू करावी?

    सामान्यतः हा अलर्ट सर्व फोनमध्ये बाय आधीपासूनच चालू असतो जेणेकरून आपत्कालीन परिस्थितीत लोकांना कोणत्याही आपत्तीबद्दल अलर्ट करता येईल. तुमच्या फोनमध्‍ये अलर्टची सेटिंग चालू नसेल तर तुम्ही ते चालू करू शकता.

    जर तुमच्याकडे आयफोन असेल तर फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन नोटिफिकेशन्सवर क्लिक करा आणि सरकारी अलर्ट्स चालू करा किंवा तुम्हाला असे अलर्ट नको असतील तर ते बंद करा. हे सेटिंग अँड्रॉइड फोनमध्येही चालू किंवा बंद केले जाऊ शकते. यासाठी फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन Safety and Emergency वर क्लिक करा आणि Wireless Emergency Alerts वर क्लिक करा आणि ते चालू किंवा बंद करा.

    12
    Wireless Emergency Alerts: A Lifeline for Public Safety - सार्वजनिक सुरक्षिततेसाठी जीवनरेखा - 2

    सर्वांना एकत्र आलेले Wireless Emergency Alert हे फक्त चाचणी करण्यासाठीं पाठण्यात आले आहेत त्यामूळे नागरिकांनी घाबरुन जाण्याचे काहीच कारण नाही.

    अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी खाली उजव्या बाजूला दिलेल्या चिन्हावर जावून आमचा Marathipride.Com हा व्हॉट्स ऍप ग्रुप जॉईन करा. Wireless Emergency Alert बद्दल ची ही महत्वपर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Latest Posts

    spot_imgspot_img

    Don't Miss

    Stay in touch

    To be updated with all the latest news, offers and special announcements.