Sunday, May 26, 2024
spot_img
More

  What care should be taken for diabetic patients in summer? उन्हाळ्यामध्ये Diabetic Patients नी काय काळजी घ्यायला हवी?

  वाढता उन्हाळा हा सर्वांनाच धोकादायक आहे त्यामध्ये लहान मुले,Diabetis patients यांना जास्त काळजी घेणे गरजेचे आहे.आज काल आपण पाहतो diabetis हा खूप कॉमन झाला आहे घरटी एक तरी डायबेटिक पेशंट हा असतोच. त्यामुळे कोणाच्या घरी डायबेटीस पेशंट नसेल तर नवल आणि असे असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे. पण डायबिटीस हा खूप गंभीर असा आजार नाही पण योग्य काळजी घेणे हेही तितकेच गरजेचे आहे जर काळजी नाही घेतली तर पेशंटच्या जीवावर बेतू शकते म्हणून डायबेटीस कंट्रोलमध्ये ठेवणे गरजेचे आहे.

  उन्हाळ्यामध्ये डायबेटिक पेशंट ने घ्यावयाची काळजी –

  1. भरपूर पाणी प्या ,जरी तुम्हाला तहान लागली नसेल तरी भरपूर पाणी प्या जेणेकरून तुमचे dehydration होणार नाही.
  2. शक्यतो अतंत्य गरजेचे नसेल तर बारा ते दुपारी चार पर्यंत बाहेर जाणे टाळावे कारण या दरम्यान उन्हाची तीव्रता खूप जास्त असते आणि त्या उन्हाचा त्रास होऊ शकतो.
  3. कॉफी किंवा एनर्जी ड्रिंक्स सारखे अल्कोहोल आणि कॅफिन असलेले पेय शक्यतो टाळा कारण असे ड्रिंक्स तुमच्या शरीरातील पाणी कमी करतात आणि तुमच्या रक्तातील साखरेची पातळी (blood sugar level)वाढवतात.
  4. बाहेर जाताना सनस्क्रीन आणि टोपीचा वापर करा.
  5. सन स्क्रीन तुम्हाला त्वचेचा पीएच मेंटेन करण्यासाठी मदत करेल.
  6. सैल-फिटिंग असणारे,हलके, हलक्या रंगाचे कपडे घाला.
  7. महिन्यातून किमान दोन वेळा तरी शुगर चेक करणे गरजेचे आहे. आपल्याकडे शक्यतो असे पाहायला मिळते की शुगर पेशंट सहा-सहा महिने रक्तातील साखरेचे प्रमाण (blood sugar level)चेक करतच नाहीत आहे तोच डोस चालू ठेवतात, पण असे न करता वरचेवर शुगर चेक करून आपला शुगरच्या औषधांचा डोस कमी जास्त करण्याची गरज आहे का ते डॉक्टरांकडून सल्ला मसलत करून घ्यावे.
  8. खूप उन्हाळा असल्यामुळे आणि मुलांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्यामुळे बरेच जण समुद्रकिनारी फिरायला जाणे पसंत करतात पण तेथेही समुद्रकिनारी सुद्धा डायबेटिक पेशंट ने अनवाणी चालणे टाळावे.

  Diabetis medicines मधुमेहाची औषधे –

  • Insulin किंवा डायबेटिक मेडिसिन थेट सूर्यप्रकाशात किंवा गरम कारमध्ये ठेवू नये.
  • प्रवासादरम्यान Insulin कुलर मध्ये ठेवा इन्सुलिन थेट बर्फावर किंवा जेल पॅक वर ठेवू नका.
  • तुमचे डायबिटीस चेक करण्यासाठी वापरण्यात येणारा डायबिटीस मॉनिटर किंवा इन्सुलिन पंप आणि इतर उपकरणे गरम कार मध्ये किंवा समुद्रकिनाऱ्यावर ठेवू नका.

  डायबिटीस वाढल्याची लक्षणे-

  • थकवा येणे
  • लघवीचे प्रमाण वाढणे
  • वारंवार तहान लागणे
  • डोळ्यासमोर अंधारी येणे
  • हात किंवा पायामध्ये मुंग्या येणे
  • भूक वाढणे
  • जखम लवकर बरी न होणे.

  वरीलपैकी कोणती लक्षणे तुम्हाला जाणवत असतील तर तुमची ब्लड शुगर लेवल वाढल्याची शक्यता असू शकते.
  आपण आज या ब्लॉगमध्ये उन्हाळ्यात डायबिटीस पेशंट ने कोणती काळजी घ्यायची याबद्दल माहिती पाहिली. तसेच आम्ही आमच्या marathipride.com या वेबसाईट वरती पुढच्या ब्लॉगमध्ये(Two types of Diabetis)डायबिटीस चे दोन प्रकार आहेत त्याबद्दल माहिती देणार आहोत ती नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरेल.तर ती नक्की वाचा.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Latest Posts

  spot_imgspot_img

  Don't Miss

  Stay in touch

  To be updated with all the latest news, offers and special announcements.