आजकाल आपण आजूबाजूला पाहतो Without Driving License गाडी चालवणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे आपल्याकडे रोड एक्सीडेंट (Road Accident) खूप जास्त होत आहेत. आपल्या धावपळीच्या आयुष्यात आपल्या सगळ्यांनाच ठरलेल्या ठिकाणी पोहोचण्याची खूपच घाई असते. प्रत्येक जण मी कसा आधी पोहोचेन?याचाच विचार करत असतो कोणालाही परिणामांची Consequences चिंता नसते. मग आपल्या मुळे कोणाला त्रास होतोय, कोणाला नुकसान सहन करावे लागते,याचा विचार करायला देखील कोणाला वेळ नसतो.याचाच परिणाम म्हणजे रोड एक्सीडेंट(Road Accident).
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने केलेल्या सर्वेनुसार महाराष्ट्रात रोड एक्सीडेंट चे प्रमाण वर्षानुवर्ष वाढत चालले आहे.
वाहतूक अधिकाऱ्यांच्या मते रोड एक्सीडेंट(Road Accident)मुळे होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत झपाटाने वाढ होण्यामागे काही मुख्य कारणे खालील प्रमाणे आहेत.
1. वेगावर नियंत्रण नसणे
2. वाहतुकीचे नियम(Traffic Rules)न पाळणे
3. हेल्मेटचा वापर न करणे.
अपघाताच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात,भारत सरकारने सुधारित विद्यमान मोटर वाहन कायदा चालू केला आहे.
आज कालची कॉलेजला जाणारी तरुण पिढी वय वर्ष 18 पूर्ण नसेल तरीही दुचाकी चालवतात त्यामध्ये,
- ड्रायव्हिंग लायसन नसणे
- भरधाव वेगाने गाडी चालवणे
- ट्रिपल सीट गाडी चालवणे
- हेल्मेट न घालता रेस लावणे
- वाहतुकीचे नियम न पाळणे
यासारख्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या गोष्टीमुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे.आणि यावरती कुठेतरी आळा बसणे गरजेचे आहे म्हणून राज्याच्या परिवहन आयुक्तांनी आरटीओ(RTO) कार्यालयांना आदेश दिले आहेत 18 वर्षाखालील मुलं-मुली दुचाकी गाडी चालवत असल्याचे आढळल्यास पंचवीस हजार रुपये दंड होणारच आणि त्यांचे वय वर्ष 25 पूर्ण होईपर्यंत त्यांना ड्रायव्हिंग लायसन्स(Driving License) दिले जाणार नाही.
मोटार वाहन कायद्यानुसार अल्पवयीन मुले दुचाकी चालवत असल्याचे आढळल्यास त्या मुलांचे पालक किंवा गाडीच्या मालकास तीन वर्ष कैदेची शिक्षा व 25 हजार रुपये पर्यंत दंड आकारण्याची तरतूद आहे.
वाहन परवाना हे वय वर्ष अठरा पूर्ण झाल्या नंतर देतात पण अल्पवयीन जर 50सीसी पेक्षा जास्त क्षमता असणारी गाडी चालवत असतील तर वयाच्या 25 वर्ष पूर्ण होईपर्यंत वाहन चालक परवाना (Driving Licence) मिळणार नाही.
मोटार वाहन कायद्यानुसार Without गियर असणाऱ्या,50 सीसी पेक्षा कमी क्षमतेच्या गाड्या 16 ते 18 वयोगटातील मुला-मुलींना चालवण्याची अनुमती आहे.
वाहन परवान्याशिवाय वाहन चालवण्याचे कायदेशीर परिणाम (Legal Consequences of Driving Without License)
1. एखादी व्यक्ती विना वाहन परवाना गाडी चालवत असेल तर 10 हजार रुपये दंड आकारला जाईल आणि त्यांचे वाहन पोलिसांकडून जप्त केले जाईल.
2. ड्रायव्हिंग लायसन्स ची समाप्ती(Expiry of Driving License)-नवीन मोटार वाहन कायद्यानुसर एखादी व्यक्ती ड्रायव्हिंग लायसन्स च्या नूतनीकरणासाठी त्याची मुदत संपण्याच्या एक वर्षापूर्वी आणि त्याची मुदत संपल्यानंतर एक वर्षापर्यंत कधीही अर्ज करू शकतात. जर तुम्ही परवाण्याची मुदत संपल्यानंतर एक वर्षानंतर नूतनीकरणासाठी अर्ज केला तर तुम्हाला ते घेणे आवश्यक आहे.
3. लायसन्स शिवाय वाहन चालवणे(Driving Without License)-नवीन कायद्याने परवाना नसलेल्या वाहनांच्या अनधिकृत वापरासाठी दंडाची रक्कम वाढवली आहे.परवानाशिवाय वाहन चालवल्यास किमान दंड 500 रुपयावरून ते 5000 रुपये करण्यात आला आहे.तर अपात्रता असूनही वाहन चालवल्याबद्दल दंड 10000 रुपये करण्यात आला आहे.
4. हेल्मेट नसणे(No Helmet)-हेल्मेट न घालता वाहन चालवल्यास एक हजार रुपये दंड आकारला जाईल
5. मद्यपान करून वाहन चालवणे(Drunk and Drive)-मद्यपान करून वाहन चालवल्यास,
पहिल्या गुन्ह्यासाठी-6 महिन्यापर्यंत तुरुंगवास आणि 10,000 रुपये दंड.
दुसऱ्या गुन्ह्यासाठी- 2 वर्षापर्यंत तुरुंगवास आणि 15,000 रुपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे.
6.अल्पवयीन असल्यास(Rules for Minors)-अल्पवयीन वाहन चालकासंबंधी एक नवीन तरतूद जोडण्यात आली आहे त्या अंतर्गत एखाद्या अल्पवयीन मुलाकडून गुन्हा घडल्यास पालक किंवा वाहन मालक यांना दोषी समजले जाईल त्यासाठी त्यांना तीन वर्षाच्या तुरुंगवासासह 25 हजार रुपये दंड केला जाईल. आणि बाल न्याय कायद्याअंतर्गत अल्पवयीन मुलांवर खटला चालवला जाईल आणि वाहनाची नोंदणी सुद्धा रद्द केली जाईल.