आपण आत्तापर्यंत बघत आलो आहोत Jio ने संपूर्ण भारतात त्यांच्या 4G,5G सेवा दिल्या आहेत. Jio ने त्यांचे 4G मोबाईल फोन सुद्धा बाजारात आणले आहेत.
अशा अनेक सुविधा देणारे Jio ने आता क्रिप्टोकरन्सी मध्ये सुद्धा वाटचाल सुरू केली आहे.यांचे पहिले पाऊल म्हणजे Jio Coin (जिओकॉइन). रिलायन्स जिओचे CEO मुकेश अंबानी यांनी Jio Coin ची घोषणा केली आहे.
आजच्या डिजिटल युगामध्ये आपण सर्वजण इंटरनेटवर बराच वेळ घालवत असतो.पण आता एक कल्पना करा, जर इंटरनेट वापरल्यानंतर तुम्हाला पैसे किंवा बक्षीस मिळाले तर? किती छान होईल नाही का?रिलायन्स जिओनी हीच कल्पना सत्यात उतरवली आहे,ती Jio Coin च्या माध्यमातून!!
आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत-
- Jio Coin म्हणजे नेमके काय?
- Jio Coin कसे कमवायचे?
- Jio Coin चा वापर कुठे करू शकतो?
- Jio Coin चे फायदे
Jio Coin म्हणजे नेमके काय?
जिओ कॉइन हे एक डिजिटल चलन (क्रिप्टोकरन्सी )आहे. जे तुम्हाला जिओच्या नवीन जिओ स्पेअर वेब ब्राउझर वापरल्यानंतर मिळते.म्हणजेच तुम्ही इंटरनेटवर काही सर्च करत असाल किंवा वेगवेगळ्या वेबसाईट्स बघत आहात तर त्यासाठी तुम्हाला जिओ कॉइन च्या स्वरूपात रिवॉर्डस मिळतील.
Jio Coin कसे कमवायचे?
1. जिओ स्पेअर ब्राउझर वापरा-
जिओ कॉइन कमावण्यासाठी तुम्हाला Jio चे जिओ स्पेअर ब्राउझर डाऊनलोड करावे लागेल.
2. वेब सर्फिंग करा-
तुम्ही जितक्या जास्त वेळ ब्राउझरवरती वेळ घालवाल तितके जास्त जिओ कॉइन तुम्हाला मिळतील.
3. जिओ वॉलेट मध्ये स्टोअर करा-
हे जिओ कॉइन तुमच्या डिजिटल वॉलेट मध्ये Save होतील.
Jio Coin चा वापर कुठे करू शकतो?
- जिओ मोबाइल रिचार्जसाठी
- रिलायन्स रिटेल स्टोअर्समधील खरेदीसाठी.
- ऑनलाइन शॉपिंग साठी
- रिलायन्स गॅस पंपावरती गॅस भरण्यासाठी देखील तुम्ही जिओ कॉइन्स चा वापर करू शकता.
भविष्यात,हे जिओ कॉइन इतर क्रिप्टोकरन्सी एक्सचेंज वर ट्रेड करणे शक्य होईल.
तुमच्या माहितीसाठी जिओकॉइनचा वापर कसा करता येईल ते उदाहरणातून समजून घेऊ. –
समजा, तुम्ही दररोज 2 तास जिओ स्पेअर ब्राउझर वर सर्फिंग करत असाल तर त्यातून तुम्हाला महिन्याला 100 जिओ कॉइन मिळतात.हे जिओ कॉइन तुम्हाला तुमच्या मोबाईल रिचार्ज साठी वापरता येतील.म्हणजेच फक्त इंटरनेट वापरून तुम्ही बचत करू शकता.
जिओ कॉइन चा फायदाच फायदा
@फुकट रिवॉर्ड्स-
इंटरनेट वापरून जिओ कॉइन कमावणे खूप सोपे आणि फायद्याचे आहे.
@ वापरण्याची पद्धत-
जिओकॉइन सहजपणे विविध सेवांसाठी वापरता येते.
@डिजिटल भविष्य-
भारतामध्ये Web 3 तंत्रज्ञान आणण्यासाठी जिओचा हा महत्त्वाचा उपक्रम आहे.
तुम्हाला असं वाटतं का, Jio Coin मुळे डिजिटल चलनाचे भविष्य बदलणार आहे? याबद्दल तुमचे विचार आम्हाला आमच्या Marathipride.com या साइटवर नक्की सांगा.अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी खाली दिलेला what’s app ग्रुप जॉईन करा.
Jio Coin वापरा,आणि डिजिटल जगात पैसा कमवा!!