महाराष्ट्राच्या राज्य उत्पादन शुल्क विभाग हा शासनाला महसूल मिळवून देणारा तिसरा सर्वात मोठा विभाग आहे.
कोरोना काळात विभागाच्या उत्पन्नाची नोंद काही प्रमाणात कमी झाली होती परंतु गेल्या तीन वर्षाच्या तुलनेत यंदा उत्पन्न वाढ चांगली झाली आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागात येत्या पाच महिन्यात वर्ग तीन आणि वर्ग चार पदांची मोठी भरती केली जाणार असून एकूण 667 पदे भरण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली.
राज्य उत्पादक शुल्क विभागात प्रथम इतकी मोठी पदभरती केली जात आहे.
टीसीएस या कंपनीमार्फत ही पदभरतीची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. याशिवाय या विभागासाठी 290 पदांच्या भरतीची मागणी केली आहे.
त्यापैकी 114 पदांची मागणी मंजूर करण्यात आली आहे
उरलेली 176 पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत भरली जाणार आहेत
याशिवाय पुढील काळात या विभागाचे उत्पन्न वाढेल आणि रिक्त पदे भरली जातील त्या दृष्टीने प्रयत्न करू असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी केले आहे