Restaurant Bill – Fake GST Scam म्हणजे काय?
आजकाल सर्रास हॉटेलमध्ये GST Scam चालू आहेत आज आपण त्याबद्दल अत्यंत महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.
आज काल आपण सगळीकडे पाहतो मग ते शहरात असो किंवा ग्रामीण भागात एखादा कार्यक्रम असो किंवा वाढदिवस आपण साजरा करतो आणि पार्टी, एन्जॉयमेंट ,सेलिब्रेशन म्हणून हॉटेलला जेवायला जाणे पसंत करतो.
अलीकडे हॉटेल बिजनेस हे खूप जास्त चालतात आणि हॉटेल बिजनेस मध्ये नफा खूप जास्त असतो.
हॉटेल बिजनेस जास्त प्रमाणात चालण्याचे कारण म्हणजे आपली आजकालची जीवनशैली,आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्यामुळे हॉटेल्स खूप जास्त चालतात असो तो ज्याच्या त्याच्या वैयक्तिक आवडीचा प्रश्न आहे.
पण आपण जे हॉटेलमध्ये जेवायला जातो तेथे बिल भरताना आपण नक्कीच खालील गोष्टींचा विचार करायला हवा.
ज्याप्रमाणे आपल्याला बिल दिल्यानंतर आपण त्यावरती जेवणाचे पदार्थ किती घेतले हे चेक करतो त्याचप्रमाणे आपण आपल्या बिलावरती किती टक्के GST लावला आहे हे चेक करणे देखील तितकेच गरजेचे आहे.
- असे खूप सारे हॉटेल्स आहेत जे की ग्राहकांच्याकडून त्यांचा मनमानी GST लावतात आणि आपल्याला ते लक्षात देखील येत नाही.
- बिलावरती पंधरा अंकी GST नंबर आहे का ते चेक करा कारण बिलावरती GST नसेल तर ते तुमच्याकडून जीएसटी घेऊ शकत नाहीत.
- जर बिलावरती GST नंबर असेल तर तुम्हाला खाली दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तो GST नंबर Valid आहे का ते चेक करा. कारण आजकाल Invalid GST नंबर देऊन ग्राहकांच्याकडून GST घेतला जातो. अशा प्रकारचे GST Scam सर्रास घडत आहेत.
या पेज वरती जाऊन बिलावरती दिलेला GST नंबर Valid आहे किंवा नाही ते चेक करा.
जर GST नंबर Valid असेल तर त्या हॉटेलचे सर्व डिटेल्स तुम्हाला समोर दिसतील.
- सर्वात आधी तुम्ही GST Status चेक करा त्यामध्ये GST Status Active असेल तर जीएसटी नंबर व्हॅलिड आहे.
- नंतर तुम्ही Taxpayer type चेक करा त्यामध्ये Taxpayer type Regular असेल तर GST नंबर व्हॅलिड आहे.
- म्हणजेच तुम्हाला वेबसाईट वरती Invalid GST,Suspended Status, Composition type हे error आले तर जीएसटी देऊ नका.
जर हॉटेल वाले तयार नाही झाले तर,
18001200232 या हेल्पलाइन नंबर वरती तक्रार दाखल करू शकता.
जनतेने जागरूकपणे या मुद्द्यांचे पालन केले तर जे हॉटेल मालक जनतेकडून मनाला वाटेल तेवढा GST वसूल करतात त्यावरती आळा घातला जाईल.