शेतकरी बंधूंनो, महाराष्ट्र राज्यातील औरंगाबाद, जालना, नांदेड, बीड, उस्मानाबाद, परभणी, लातूर, हिंगोली, सांगली, अमरावती, वाशिम, अकोला, बुलढाणा, यवतमाळ व वर्धा अशा चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांतील शिधापत्रिका धारकांसाठी Direct Benefit Transfer-DBT योजना राबविण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या अंतर्गत आता शेतकऱ्यांना अन्नधान्याच्या बदल्यात पैसे मिळणार असल्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे.
केसरी रेशनकार्डधारकांचे धान्य वाटप काही काळ थांबवण्यात आले होते. त्यामुळे केसरी रेशनकार्डधारक शेतकरी रेशन धान्याचा लाभ घेऊ शकले नाहीत, त्यामुळे आता केसरी रेशनकार्डधारकांना धान्याऐवजी पैसे वाटप करण्याचा निर्णय सरकारअंतर्गत घेण्यात आला आहे.
शासनातर्फे शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत, त्यापैकी एक म्हणजे शेतकऱ्यांना धान्याऐवजी पैसे वाटप केले जाईल,त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना आर्थिक मदत होईल.
शासना अंतर्गत घेतलेल्या निर्णयानुसार शेतकऱ्यांना पैसे वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. मात्र हा निर्णय योग्य नसल्याचा आक्षेप विरोधकांनी घेतला, मात्र काही लोकांनी या निर्णयाला चांगला प्रतिसाद दिला आहे.
केसरी रेशनकार्डधारकांना एवढे पैसे मिळणार –
आता शेतकऱ्यांना धान्याच्या बदल्यात प्रति व्यक्ती 150 रुपये मिळणार आहेत. अशाप्रकारे दरमहा 150 रुपये प्रतिव्यक्ती ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या नावे त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल.
त्याचप्रमाणे प्रति व्यक्ति वार्षिक 1800 रुपये खात्यात जमा केले जातील.
पैसे मिळवण्यासाठी अर्ज करण्याची पद्धत खालीलप्रमाणे – धान्याच्या बदल्यात पैसे मिळवण्यासाठी अर्ज करताना,
(1)सर्वप्रथम तुम्हाला रेशनकार्डधारकांसाठी तहसिल कार्यालयाकडून विहित नमुन्यातील बँक खाते फॉर्म मिळवावा लागेल.
(2)अर्ज घेतल्यानंतर अर्जामध्ये संपूर्ण महिती अचूक भरावी, त्यासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे सादर करावीत.
1. कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आधारकार्डची झेरॉक्स
2. रेशनकार्ड झेरॉक्स.
3. तसेच कुटुंबातील महिला सदस्यांच्या बँक पासबुकची झेरॉक्स.
अशाप्रकारे बँक पासबुक झेरॉक्स देताना, कुटुंबातील महिला प्रमुखाची बँक पासबुक झेरॉक्स देणे आवश्यक आहे. कारण वाटण्यात येणारे पैसे महिलांच्या खात्यात जमा होणार आहे.
संपूर्णपणे भरलेला अर्ज संबंधित एपीएल रेशनकार्डधारक शेतकऱ्यांनी स्वस्त दुकानदारांकडे जमा करावा.
या योजनेचा लाभ मिळण्यासाठी शिधापत्रिकेवर नोंद असलेल्या सर्व सदस्यांचे आधार क्रमांक शिधापत्रिका व्यवस्थापन प्रणालीशी ( Ration Card Management System-RCMS)जोडलेले असणे आवश्यक असेल. म्हणजेच RCMS प्रणाली वर आधार क्रमांक संलग्न असलेल्या लाभार्थ्यांना BDT योजनेचा लाभ मिळेल.
अशाप्रकारे वरील सर्व माहीतीवरून, तुम्हाला हे कळले असेल की धान्याच्या बदल्यात कोणाला पैसे मिळणार आहेत, तसेच अर्ज कसा करावयाचा आहे,आणि फायदे कसे मिळवायचे आहेत.