सावधान विरुद्ध आहार कधीच एकत्र खाऊ नका शरीरावर भयंकर परिणाम होतील.
- 1 मासे खाल्ल्यानंतर चुकूनही दूध, दही,ताक यांचे सेवन करू नये, त्यामुळे अंगावर कोड फुटतात. असे भयंकर आजार उत्पन्न होतात.
- 2 दुधासोबत खारट,आंबट, तिखट मसालेदार पदार्थ खाऊ नयेत त्यामुळे अनेक त्वचा विकार (Skin Diseases) होतात. पोट साफ होत नाही,पचनाचे आणि पोटाचे अनेक विकार होतात.
- 3 रात्रीच्या वेळी दही खाऊ नये त्यामुळे कफ दोष होऊन शरीरात अनेक आजार वाढू लागतात. आता उन्हाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे ताक, दही खाणे चांगले आहे,पण ते दिवसा खावे रात्रीच्या वेळी दही खाणे टाळावे.
- 4 केळी आणि दही एकत्र करून खाणे टाळावे कधी कधी आपण विरुद्ध आहार घेतो पण त्याचे अनेक वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतात.
- 5 मध गरम करू नये किंवा कोणत्याही गरम पदार्थांमध्ये मिक्स करून खाऊ नये.जर मध दुसऱ्या पदार्थांमध्ये मिक्स करायचा असेल तर तो पदार्थ एकदम थंड झाल्यानंतर त्यामध्ये मध मिक्स केला तर चालेल.
- 6 काश्याच्या भांड्यामध्ये तूप दहा दिवसांपेक्षा जास्त दिवस ठेवून त्याचा वापर करू नये.
- 7 मध आणि तूप एकत्र करून खाऊ नये मध आणि तूप हे एकमेकांच्या विरुद्ध आहार आहेत त्याचे एकत्र सेवन करून खाऊ नये.
- 8 शेंगदाणे खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नये त्यामुळे पोटात गॅस होतात, पातळ जुलाब लागतात. काहीजण कोमट पाणी पितात तर ते तसे करणे ही शरीरासाठी धोकादायक असते.
- 9 चहा, कॉफी अशी गरम पिल्यानंतर लगेच थंड पदार्थ खाऊ नयेत. थंड आणि गरम हे दोन विरुद्ध प्रकार आहेत.त्यामुळे शरीरावर त्याचा वाईट परिणाम होतो.
- 10 मांसाहार केल्यानंतर लगेच दुध किंवा दुधाचे पदार्थांचे सेवन करू नये.
- 11 नाश्ता किंवा जेवण केल्यानंतर लगेच अंघोळ करू नये त्यामुळे खाल्लेले अन्नाचे व्यवस्थित पचन होत नाही. व्यवस्थित पचन न झाल्यामुळे पित्ताचा त्रास होणे,पोट गच्च होणे,जळजळ यासारख्या तक्रारी उद्भवतात.आज कालच्या धावत्या जीवनशैलीत या गोष्टी टाळायलाच हव्यात.
- 12 तेलकट तुपकट किंवा आंबट पदार्थ खाल्ल्यानंतर चुकूनही थंड पदार्थ खाऊ नये त्यामुळे चिकट कफ तयार होऊन घसा बसतो, फुफुसाचे आणि पोटाचे विकार होऊ शकतात.