Saturday, July 13, 2024
spot_img
More

  Namo Shetakari Mahasanman Nidhi Yojana

  आता शेतकऱ्यांना प्रति वर्षी १२००० रुपये मिळणार. आपल्या प्रिय शेतकरी बांधवांनो आपल्यासाठी आनंदाची बातमी.

  या योजनेत केंद्र सरकारच्या प्रती वर्ष प्रती शेतकरी ६००० रुपयात राज्य सरकार आणखी ६००० रुपये भर घालणार आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना १२००० रुपये प्रति वर्षी मिळतील.
  याचा लाभ एक कोटी १५ लाख शेतकरी कुटुंबांना मिळणार आहे. यासाठी २०२३-२०२४ साठी ६,९०० नऊशे कोटी रुपये इतका निधी प्रस्तावित आहे.

  आपला अन्नदाता बळीराजा यांच्या उत्पन्न वाढीसाठी पंतप्रधानांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पंतप्रधान कृषी सन्माननिधी योजनेत शासनाच्या अनुदानाची भर घालणारे “नमो शेतकरी महासन्माननिधी”ही योजना माननीय फडणवीस यांनी जाहीर केली.

  काय आहे नेमकी ही योजना?

  या योजनेत केंद्र सरकारच्या प्रती वर्ष प्रती शेतकरी सहा हजार रुपयात राज्य सरकार आणखी सहा हजार रुपये घालणार आहे.
  त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना १२००० रुपये प्रतिवर्षी मिळतील.
  केंद्र सरकारने २०१६ च्या पीक विमा योजनेत विमा हप्त्याच्या दोन टक्के रक्कम शेतकऱ्यांनी भरण्याची तरतूद आहे.आता हा भार ही शेतकऱ्यावर न ठेवता त्यांच्या हिस्सा चा विमा हप्ता राज्य शासन भरेल.
  शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून प्रधानमंत्री पिक विमा योजनेवर नोंदणी करता येईल असेही फडणवीस यांनी सांगितलं आहे.

  नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठी पात्रता
  या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र होतील यासाठी पात्रता काय आहे हे आपण जाणून घेऊ.

  १. शेतकरी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
  २. शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र असावा.
  * नमो शेतकरी योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
  १. आधार कार्ड
  २. रहिवासी प्रमाणपत्र
  ३. शेतीचा सातबारा
  ४. बँक खाते पासबुक
  ५. मोबाईल नंबर (आधार कार्ड आणि बँक खात्याला लिंक असलेला)

  नमो शेतकरी योजना अर्ज प्रक्रिया

  नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना 9 मार्च 2023 रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याद्वारे जाहीर करण्यात आली होती.
  या योजने संबंधित शासनाकडून कोणताही जी.आर. निघालेला नाही त्यासोबतच या योजनेसाठी कोणतेही पोर्टल अजून बनवण्यात आले नाही.
  शासनाकडून या योजनेसंबंधी नवीन अपडेट येईल तेव्हा आम्ही आमच्या marathipride.com या वेबसाईटवर अर्ज प्रक्रिया अपडेट करू. तसेच या योजने संबंधित अजून कोणतीही माहिती हवी असल्यास तुम्ही आमच्या marathipride.com या वेबसाईट वरती कमेंट करू शकता. तुम्हाला हवी ती माहिती लवकरात लवकर तुमच्या पर्यंत पोहोचवण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करू.
  प्रिय शेतकरी बांधवांना ही माहिती तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना याचा फायदा घेता येईल.

  LEAVE A REPLY

  Please enter your comment!
  Please enter your name here

  Latest Posts

  spot_imgspot_img

  Don't Miss

  Stay in touch

  To be updated with all the latest news, offers and special announcements.