My Scheme Portal: All Government Schemes – आज काल आपण पाहतो आपले भारत सरकार आपल्या जनतेच्या हितासाठी नवनवीन स्कीम काढत असतात त्याचा फायदा आपल्या सर्वसामान्य जनतेला नक्कीच होतो सुद्धा. पण आपल्या धकाधकीच्या आयुष्यात या नवीन निघणाऱ्या योजना कोणत्या आहेत त्या कधी निघतात,त्याचे स्वरूप काय आहे, यामधील कोणती योजना आपल्यासाठी आहे याबद्दल अपडेट राहायला जमत नाही.
वेळेअभावी आपण आपल्या फायद्यासाठी ज्या योजना निघतात त्यांच्यापासून वंचित राहतो आणि त्याचे फायदे (Benefits)आपल्याला मिळत नाहीत.
आम्ही तुम्हाला या ब्लॉगमध्ये आपल्याला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त योजनांच्या बद्दल माहिती जाणून घेण्यासाठी काय करता येईल, याबद्दल माहिती सांगणार आहोत.
https://www.myscheme.gov.in/ ही एक अशाच प्रकारची वेबसाईट आहे, जिथे आपल्याला सरकारच्या सर्व प्रकारच्या योजनांची माहिती एकाच ठिकाणी मिळते.
Table of Contents
My Scheme पोर्टल उद्दिष्टे-
1. MyScheme पोर्टल सुरु करण्यामागे एक Single Stop platform तयार करुन देणे उद्दिष्ट आहे जेथे केंद्र सरकारच्या विविध योजनांसाठी तुम्ही अर्ज करू शकतात.
2. या पोर्टलमुळे नागरिक आता ऑफलाईन अर्ज पद्धतीवर अवलंबून राहणार नाहीत.
3. सरकारी योजनांसाठी अर्ज प्रक्रिया सुलभ करणे. पूर्वी एखाद्या योजनेसाठी नोंदणी करायची असेल तर नागरिकांना अनेक सरकारी कार्यालयांमध्ये जावे लागत होते मात्र हे पोर्टल सुरू झाल्याने नागरिकांसाठी अर्जाची प्रक्रिया सुलभ करून ही समस्या दूर झाली आहे.
4. या पोर्टल द्वारे नागरिकांना कृषी,शिक्षण,व्यवसाय कौशल्य विकास,रोजगार,क्रीडा संस्कृती,आरोग्य आणि कल्याण या सर्व संबंधित योजनांसाठी एकाच ठिकाणी अर्ज करण्याची सोय आहे यामुळे विविध पोर्टल किंवा वेबसाईटवर अर्ज करण्याची गरज नाहीशी होते ज्यामुळे अर्ज प्रक्रिया सुलभ होते आणि त्यांचा वेळ वाचतो.
MySchme पोर्टल चे फायदे-
1.myscheme.gov.in पोर्टल सरकारी योजनांच्या सर्व श्रेणीमध्ये सहज प्रवेश प्रदान करते.विविध सरकारी योजना शोधण्यासाठी हा एक चांगला प्लॅटफॉर्म आहे. हे पोर्टल वापरकर्त्यांना योग्य त्या सरकारी वेबसाईट वर नेविगेट करते आणि त्यांना आवश्यक असलेली माहिती शोधण्यास मदत करते.
2. लाभार्थीं त्यांच्या पात्रते नुसार योजना शोधू शकतात त्यांना त्यांच्या आवश्यकतेनुसार जुळणाऱ्या संबंधित योजना सापडतील.
3. विविध सरकारी योजनांसाठी अर्ज कसा करायचा व अर्ज प्रक्रिया सोपी करून देण्यासाठी मार्गदर्शन देते. हे पोर्टल त्यासाठी लागणारे पात्रता निकष,अर्ज प्रक्रिया,फायदे आणि संबंधित कागदपत्रासह प्रत्येक योजनेबद्दल तपशीलवार माहिती प्रदान करते.
4. MyScheme पोर्टल नागरिकांना विविध सरकारी योजना अंतर्गत लाभांसाठी अर्ज करण्याची परवानगी देते. पोर्टलमध्ये 13 श्रेणीमध्ये 203 प्रकारच्या सरकारी योजनांचा समावेश आहे.
5. या पोर्टल द्वारे वेळेची बचत तर होतेच पण यशस्वी अर्जाची शक्यता देखील वाढते.
Myscheme पोर्टल पात्रता –
1. या पोर्टलच्या वैशिष्ट्यांचा वापर करण्यासाठी अर्जदारांनी देशाचे कायमचे रहिवासी असणे आवश्यक आहे
2. पोर्टल सर्व सामाजिक वर्गातील नागरिकांसाठी खुले आहे, प्रत्येकाला त्याच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी समान पात्रता प्रदान करते.
National-e Goverment Division(NEGD) इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
प्रशासकीय सुधारणा आणि सार्वजनिक तक्रार विभाग यांच्या समर्थांनासह myscheme.gov.in हे प्लॅटफॉर्म विकसित आणि ऑपरेट करते.