महाराष्ट्र शासनाने माझी कन्या भाग्यश्री योजना सुरू करण्याचा उद्देश मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार निर्माण करणे,लिंगनिवडीस प्रतिबंध घालने, मुलींच्या शिक्षणासाठी समाजाला प्रोत्साहन देणे,आपल्या समाजामध्ये मुलांच्या जन्मानंतर आनंद साजरा करतात पण मुलींच्या जन्मानंतर अजूनही काही ठिकाणी आनंदाचे वातावरण पाहायला मिळत नाही. हेच चित्र बदलण्यासाठी आणि मुलींचे चांगल्या प्रकारे पालन पोषण करण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी या योजनेअंतर्गत शासनाकडून आर्थिक सहाय्य केले जाते.
या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीतून मुलींनी आपले शिक्षण पूर्ण करावे जेणेकरून पुढील मातांची पिढी शिक्षित होईल आणि शिक्षित माता मुलगा किंवा मुलगी हा भेद न करता दोघांनाही समानतेची वागणूक देऊन जी नवीन पिढी तयार करतील ती आरोग्य संपन्न आणि शिक्षित होईल हा शासनाचा मुख्य उद्देश आहे.
या योजनेचे आणखी काही उद्देश-
1 लिंगनिवडीस प्रतिबंध करणे.
2 बालिकांचा जन्मदर वाढवणे.
3 मुलींच्या जीवनमानाबद्दल खात्री देणे.
4 मुलींना समाजात मुलांच्या बरोबरीने समान दर्जा मिळवून देणे.
5 मुलींच्या शिक्षणास प्रोत्साहन देणे.
माझी कन्या भाग्यश्री योजना ही नवीन सुधारित योजना संपूर्ण महाराष्ट्रात राबवली जाणार आहे या योजनेच्या अंतर्गत समाजातील सर्व वर्गातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबात जन्म घेणाऱ्या प्रत्येक मुलीला या योजनेचा लाभ मिळणार आहे.
तसेच शासनाच्या नवीन नियमानुसार दारिद्र्यरेषेवरील पांढरे रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबात जन्मलेल्या मुलींना सुद्धा या योजनेचा फायदा मिळणार आहे.
या योजनेमध्ये
1. सुरुवातीला मुलगी सहा वर्षाची असताना जमा रकमेच्या व्याजाची धनराशी मिळेल.
2. यानंतर दुसऱ्या वेळेस मुलगी बारा वर्षाची झाल्या नंतर व्याजाची रक्कम मिळेल.
3. मुलगी पूर्ण अठरा वर्षाची झाल्यानंतर तिला पूर्ण धनराशी आणि व्याजाची सर्व रक्कम मिळेल.
या योजनेमध्ये मुलगी आणि तिची आई यांच्या नावाने बँकेमध्ये संयुक्त सेविंग खाते उघडण्यात येईल, ज्यामध्ये सरकार द्वारा वेळोवेळी धनराशी जमा केली जाईल.
महाराष्ट्र माझी कन्या भाग्यश्री योजनेचा लाभ घेण्यासाठी मुलीचे अठरा वर्ष वय पूर्ण आणि शैक्षणिक पात्रता कमीत कमी दहावी असणे आवश्यक आहे आणि मुलगी अविवाहित असणे आवश्यक आहे.
ज्या कुटुंबाचे उत्पन्न साडेसात लाखापर्यंत आहे अशा समाजातील सर्व घटकांसाठी ही योजना लागू करण्यात येत आहे.
या योजनेचा लाभ मिळण्यासाठी अटी व पात्रता-
1 लाभार्थी मुलीचे वडील महाराष्ट्र राज्याचे मूळ रहिवाशी असणे गरजेचे आहे.
2 एका मुलीनंतर माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर देण्यात येणारी रक्कम पन्नास हजार मुलीच्या नावे बँकेत मुदत ठेव योजनेत गुंतवण्यात येईल.
3 दोन मुली नंतर माता किंवा पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्यानंतर देण्यात येणारी रक्कम पहिल्या व दुसऱ्या मुलीच्या नावे प्रत्येकी 25 हजार याप्रमाणे पन्नास हजार मुलींच्या नावे बँकेत मुदत ठेव योजनेत गुंतवण्यात येईल.
4 एका मुलीच्या जन्मानंतर माता किंवा पित्याने एक वर्षाच्या आत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून योजनेचा लाभ मिळवण्यासाठी संबंधित बालविकास प्रकल्प अधिकारी ग्रामीण किंवा नागरी यांच्याकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे त्यानंतर सादर केलेल्या अर्जाचा विचार करता येणार नाही.
5 तसेच दोन मुली नंतर सहा महिन्याच्या आत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केल्याचे प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करण्याऱ्या कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येईल.
अर्जासोबत जोडावयाचे कागदपत्रांची यादी-
1 कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र.
2 उत्पन्नाचा दाखला.
3 रेशन कार्ड .
4 लाभार्थी मुलीचे आधारकार्ड.
5 सावित्रीबाई फुले योजनेचा लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र.
“माझी कन्या भाग्यश्री”योजनेअंतर्गत सुविधांचा लाभ मिळविण्यासाठी मुलीच्या वतीने तिच्या पालकांनी करावयाच्या अर्जाचा नमुना खाली मिळेल.
Plz give me a form