Max Fit Program – Wellness Benefits – रोज चालायला जायला आवडते? मग आता त्याचे पैसे मिळणार.
आज आम्ही तुम्हाला या ब्लॉगमध्ये खालील मुद्दे सांगणार आहोत. Max Life Insurance – Max Fit Program
1.चालायला जा आणि पैसे कमवा ही स्कीम काय आहे?
2. इन्शुरन्स चे फायदे कसे मिळवायचे?
3. इन्शुरन्स प्रीमियम वरती डिस्काउंट(Discounts)कसा मिळेल?
“निरोगी आयुष्य हे यशाची गुरुकिल्ली आहे”असे आपण मानतो मग निरोगी आयुष्य जगण्यासाठी तुम्हाला रोजच्या रोज व्यायाम करणे गरजेचे आहे.मग त्यासाठी चालणे(Walking)हा अत्यंत सोपा असा व्यायाम आहे आणि त्यासाठी पैसे मोजावे लागत नाहीत.
आपण आपले भविष्य सुरक्षित रहावे यासाठी काही सोयी करून ठेवतो आणि या सोयीचाच एक भाग म्हणजे इन्शुरन्स(Insurance).
आयुष्यात अचानकपणे उद्भवणाऱ्या आजारपणात योग्य आणि चांगले उपचार घेण्याची गरज असते त्यासाठी लागणारा पैसा कुठून येणार?तर त्याचे उत्तर आहे योग्य वेळेत काढला गेलेला इन्शुरन्स(Insurance).
आज काल मार्केटमध्ये हेल्थ इन्शुरन्स देणाऱ्या अनेक कंपन्या आहेत ज्या आपल्याला आपल्या आजारपणाचा सर्व खर्च देतात.मग काही अशा इन्शुरन्स कंपन्या आहेत त्यांना नेहमीच असे वाटते की आपले विमाधारक नेहमीच Healthy राहिले पाहिजेत. त्यासाठी ते अनेक प्लॅन्स ,स्कीम्स काढत असतात.
अलीकडेच Insurance Regularly And Development Authority Of India(IRDAI) ने जे विमाधारक आहेत त्यांना Health Benefits मिळण्यासाठी त्यांच्या Insurance Premium वरती डिस्काउंट देण्यासाठी इन्शुरन्स कंपनींना परवानगी दिली आहे.
यामुळे जे विमाधारक आहेत त्यांच्या मध्ये health awareness निर्माण होईल.
यामध्ये Max Life Insurance ही सुद्धा एक अशीच कंपनी आहे. ज्यामध्ये तुम्हाला चालायला जा आणि पैसे कमवा (Walk Daily And Get Health Benefits)अशी सुविधा आहे. याचे benefits कसे मिळवायचे ते आपण पाहणार आहोत.
1. तुम्हाला Max Life Insurance या त्यांच्या कंपनीचे Max Fit हे ॲप डाऊनलोड करायचे आहे.
2. तुम्ही रोज चालायचा व्यायाम करायचा आहे आणि एका आठवड्यात 50,000 स्टेप्स पूर्ण करा.
3. चालण्यामध्ये असेच सातत्य 3 आठवडे ठेवा.
4. 3 आठवडे असेच सातत्य राहिले तर तुम्हाला Insurance Premium वरती 5% Discount मिळेल.
5. तुम्ही पूर्ण वर्षभरात 36 आठवडे चालण्यामध्ये सातत्य ठेवले तर तुम्हाला Premium वरती 10% डिस्काउंट मिळेल.
6. तुमच्या चालण्यामध्ये जितके सातत्य राहील तितका Premium वरती Discount वाढत जाईल.
खाली दिलेल्या चार्ट वरून तुम्हाला Premium Discounts Details लक्षात येतील.
अशाच प्रकारे Health Benefits देणाऱ्या मार्केटमध्ये काही कंपन्या आहेत त्याची लिस्ट खाली दिली आहे.
1. ICICI Lombard
2. Max Life Insurance
3. Bajaj Life Insurance
4. ACKO
5. Aditya Birla
6. HDFC Life Insurance.
आमचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? कमेंट मध्ये सांगा आणि हा ब्लॉग तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. आमच्या marathipride.com वरती जे नवीन अपडेट्स येत आहेत ते वाचण्यासाठी उजव्या बाजूला दिलेल्या चिन्हा वरती जाऊन आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.