Mappls Mapmy India – It’s time to Uninstall your Google Map
आपल्याला कोणत्याही नवीन ठिकाणी जायचे असेल तर, आजकाल फारसा विचार करावाच लागत नाही. शिवाय तेथे राहण्याची सोय कशी असेल, जेवणाची सोय किंवा मग रस्ते कसे असणार अशा अनेक प्रश्न आपल्याला पडतात. हे सर्व गोष्टी आता Google Map मुळे खूपच सोप्या झाल्या आहेत. शिवाय आपण फिरायला जाणार असाल तर कोणते ठिकाण चांगले आहे? त्यासाठी किती खर्च होईल? अशा अनेक गोष्टींचे नियोजन घरबसल्या करून मगच बाहेर पडणे सोपे झाले आहे.
आत्तापर्यंत आपण गुगल मॅप वापरण्याला पसंती देत होतो पण Google Map ला Uninstall करण्याची वेळ आली आहे. याचे कारण म्हणजे आपल्या India चा ऑफिशियल Mappls app लॉन्च झाला आहे. आपल्या India चा जो लॉन्च झालेला Map आहे त्यामध्ये अनेक असे नवीन फीचर्स आहेत. जे तुम्हाला गुगल मॅप मध्ये सुद्धा पाहायला मिळाले नाहीत. त्यामुळे इंडियाचा मॅप वापरणे अधिक सोपे आणि फायद्याचे ठरेल. Mapmy India ने इंडियाचा नवीन Map लॉन्च केला आहे.
Mappls Mapmy India मध्ये कोणते आहेत नवीन फिचर्स –
1 जर तुम्ही एखाद्या अनोळख्या ठिकाणावरून गाडी चालवत असाल आणि तुमच्यासमोर उड्डाणपूल आला असेल तर तुम्ही विचारात पडता कोणत्या दिशेने जायचे आहे? तूम्ही अशावेळी गोंधळून जाता तसेच गुगल मॅप सुद्धा Confuse होतो. पण India चा जो नवीन लॉन्च झालेला Map आहे त्यामध्ये अशा उड्डाण पुलावरून गाडी चालवत असताना फोटो animation सहित दाखवेल की तुम्हाला कोणत्या दिशेने जायचे आहे. त्यामुळे तुमचा रस्ता चुकण्याचा प्रश्नच येत नाही. शिवाय तुमचा वेळही वाचेल.
2 तुम्ही कुठेतरी फिरायला जायचा विचार करत असाल तर, अगोदरच तुम्हाला पेट्रोल आणि डिझेल चे बजेट काढायचे असेल तर तुम्हाला ते आधीच काढता येईल. India च्या Map मध्ये जावून तुम्हाला रुपये वरती क्लिक करून तेथे तुम्हाला तुमच्या गाडीचे Average टाकावे लागेल आणि पेट्रोल, डिझेलचा दर टाकून तुमचा किती खर्च होईल हे समजेल. अशा प्रकारे तुम्हाला तुमचे बजेट आधीच काढता येईल.
3 आज काल प्रत्येकालाच वेळेत पोहोचण्याची घाई असते. त्या घाई मध्ये आपण गाडी खूप जास्त वेगात चालवतो. पण आजकाल सरकारने स्पीड नियंत्रणात आणण्यासाठी ठीक ठिकाणी Speed Gun किंवा Camera लावले आहेत. याचा आपण विचारच करत नाही आणि गाडी वेगात चालवतो. पण आपल्याला त्याचा दंड देखील भरावा लागतो हे नंतर लक्षात येते. म्हणून Mapmy India च्या Mappls मुळे तुम्हाला चलन भरावे लागणार नाही, कारण यामध्ये तुमच्या गाडीचे स्पीड जास्त असेल तर तुमच्या स्क्रीन वरती तुम्हाला Warning ⚠️ येईल म्हणजेच गाडीचा स्पीड स्लो करा. त्यामुळे तुम्हाला वेगात गाडी चालवल्याबद्दल चलन भरावे लागणार नाही.
Mapmy India ने Mappls या नावाने नवीन map application लॉन्च केले आहे.
https://play.google.com/store/apps/details?id=com.mmi.maps&hl=en&gl=US&pli=1
ही महत्त्वपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा. त्यामुळे Mapmy India च्या Map चा फायदा त्यांना घेता येईल. अशाच नवनवीन आणि महत्वपूर्ण माहितीसाठी खाली दिलेल्या चिन्हावरती क्लिक करून आमचा Marathi pride.com हा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.