Monday, November 18, 2024
spot_img
More

    Travel Insurance in India – Know what will benefit you from Travel Insurance – जाणून घ्या काय होईल तुम्हाला फायदा Travel Insurance चा

    Travel Insurance in India -  Know what will benefit you from Travel Insurance

    आपल्या आजूबाजूचे जग हे अनेक नवनवीन आणि सुंदर अशा गोष्टींचा खजिना आहे,गरज आहे ते फक्त शोधण्याची. एक उत्स्फूर्त अशी Road trip असो किंवा काळजीपूर्वक नियोजित केलेली International tour असो. प्रवास हा आपल्या दैनंदिन दिनचर्येतून थोडासा का होईना निवांत पणा देतो म्हणूनच नवनवीन गोष्टींचा अनुभव घेण्यासाठी आपण प्रवास करायलाच हवा. पण प्रवास करताना अनेक अनिश्चित आणि अनपेक्षित घटना उद्भवू शकतात,म्हणून Travel Insurance असणे खूप गरजेचे आहे.

    clickhere click
    Travel Insurance in India - Know what will benefit you from Travel Insurance - जाणून घ्या काय होईल तुम्हाला फायदा Travel Insurance चा 3

    आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत

    Travel Insurance का महत्त्वाचा आहे? 
    Travel Insurance चे फायदे काय आहेत?

    1. अनपेक्षितपणे होणाऱ्या अपघातापासून तुमचे संरक्षणPersonal liability cover

    आपण रस्त्यावरून गाडी चालवत असताना अनपेक्षित पणे एखादी दुर्घटना घडली किंवा अपघात झाला तर अशावेळी traveling Insurance फायद्याचा ठरतो. वैद्यकीय आणिबाणीमुळे ट्रीप रद्द झाली किंवा हरवलेले सामान आणि फ्लाईटला होणारा विलंब यासारख्या अडथळे येतात. Traveling Insurance मुळे हे सुनिश्चित होते की तूम्ही अशा प्रकारच्या अडथळ्यांचा आर्थिक भार सहन करू शकता.

    2. वैद्यकीय खर्चासाठी सुरक्षा व्यवस्था-

    तुम्ही घरापासून लांब असताना आजारी पडणे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या वैद्यकीय आणीबाणीला तोंड द्यावे लागले तर अशा परिस्थितीत ते तुमच्यासाठी भयानक असू शकते. म्हणून Travel Insurance मध्ये वैद्यकीय खर्च, हॉस्पिटललायझेशन खर्च आणि अगदी आपत्कालीन वैद्यकीय कव्हर सुद्धा तुम्हाला यामध्ये मिळते. त्यामुळे तुम्हाला जास्त बिलाची चिंता न करता उपचारावरती लक्ष केंद्रित करता येते.

    3. ट्रीप रद्द होणे – Flight delay/cancellation cover

    आपल्या आयुष्यात कधी काय घडेल हे सांगता येत नाही. त्यामुळे आपल्याला कधी कधी आपल्या नियोजन केलेल्या योजना बदलणे किंवा रद्द कराव्या लागतात अचानक येणारे आजारपण तर कधी नैसर्गिक आपत्ती सारख्या अनपेक्षित घटना मुळे जर तुम्हाला तुमचा प्रवास रद्द करावा लागला तर Travel Insurance हा नॉन रिफंडेबल ट्रिप खर्चाची परतफेड करून तुमचे होणारे आर्थिक नुकसान टाळता येते. फ्लाइट लेट किंवा रद्द होणे असामान्य नाही आणि यामुळे तुमची मोठी गैरसोय आणि आर्थिक नुकसान होऊ शकते. फ्लाइट late/cancellation कव्हर अॅड-ऑन चा उपयोग फ्लाइट विलंब किंवा रद्द केल्यामुळे झालेल्या कोणत्याही खर्चासाठी कव्हरेज देते. यामध्ये हॉटेल, वाहतूक, जेवण आणि बरेच काही यासारख्या खर्चाचा समावेश असू शकतो

    4. Adventurous Sports चे कव्हरेज –

    आपण पाहतो आयुष्यात काही लोकांना adventure activities करायला खूप आवडतात. त्यामध्ये मोठी रिस्क असेल तरीही ते अशा प्रकारचा धाडस करत असतात. त्यामध्ये Paragliding, Para-sealing, करत असाल किंवा स्कुबा ड्रायविंग करत असाल तर तुमच्याकडे Travel Insurance आहे हे तुम्हाला माहीत असल्यामुळे तुमचे जे Adventure activity करण्याचा जो अनुभव आहे तो तुम्हाला अधिक जास्त रोमांचक आणि आठवणीत राहील असा बनवता येईल.

    5. 24X7 सहाय्यता

    Travel Insurance हा तुम्हाला आर्थिक संरक्षण तर देतोच शिवाय 24 तास सहाय्य देखील प्रदान करतो. ट्रॅव्हल इन्शुरन्स अनेकदा प्रवासामध्ये होणारी गैरसोय किंवा आपत्कालीन रोख रक्कम तसेच फ्लाईटचे रीबुकिंग करणे यासारखी सहाय्यक सेवा पुरवतो त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्हाला अनोळख्या ठिकाणी कधीही एकटे वाटणार नाही.

    6. सामान्य प्रवासातील गैरसोय Common travel inconveniences

    पासपोर्ट हरवणे, सामान गहाळ होणे किंवा सामान मिळण्यास उशीर होणे, आणि अगदी फ्लाइटला होणारा वेळ हा एक मोठा धक्का असू शकतो. परदेशात प्रवास करताना हे विशेषतः खरे आहे. परंतु तुमचा Travel Insurance तुम्हाला या खर्चाची भरपाई करेल. नवीन पासपोर्ट मिळविण्यासाठी लागणार्‍या कोणत्याही खर्चाची पूर्तता केली जाईल.

    Best Travel Insurance in India 2023

    S.No.Name of the Insurance Company
    1.Tata AIG Travel Insurance
    2.Apollo Munich Travel Insurance
    3.Care Travel Insurance
    4.Bajaj Allianz Travel Insurance
    5.HDFC ERGO Travel Insurance

    प्रवासाच्या या मोहक जगात Travel Insurance हा तुम्हाला तुमच्या प्रवासात खात्री आणि मन:शांतीचा आनंद देतो. ज्यामुळे तुम्हाला संभाव्य अपघातांची चिंता न करता नवीन अनुभव स्वीकारता येतात याचे महत्त्व आर्थिक संरक्षणाच्या पलीकडे जाते. या आव्हानात्मक काळात सहानुभूती देण्याचे काम Travel Insurance करतो. हे तुम्हाला आठवण करून देते की तुम्ही नवीन ठिकाणी गेलात तर तुम्ही एकटे नाही, त्यामुळे पुढच्या वेळी जग एक्सप्लोर करण्यासाठी निघाल तेव्हा Travel Insurance हा तुमचा विश्वासू साथीदार होऊ द्या. जे तुम्हाला चिंतामुक्त भटकण्यासाठी आणि आयुष्यभर टिकणाऱ्या अविस्मरणीय आठवणी निर्माण करण्यास सक्षम बनवेल.

    तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा. ही महत्वपूर्ण माहिती तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा जेणेकरून त्यांना देखील प्रवासाचा मनमुराद आनंद लुटता येईल. अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी खाली दिलेल्या चिन्हावर क्लिक करून आमचा मराठी Marathipride.com हा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा.

    clickhere click
    Travel Insurance in India - Know what will benefit you from Travel Insurance - जाणून घ्या काय होईल तुम्हाला फायदा Travel Insurance चा 4

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Latest Posts

    spot_imgspot_img

    Don't Miss

    Stay in touch

    To be updated with all the latest news, offers and special announcements.