भारतामध्ये भारत सरकारने दिलेले Aadhaar Card हे आपली ओळख सांगणारे ओळखपत्र आहे.आधार कार्ड हे आपल्या साठी खूप महत्त्वाचे कागदपत्र आहे.जे नागरिकांचा पत्ता,तसेच त्यांची ओळख सांगणारे कागदपत्र आहे.तसेच,सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी वापरले जाणारे मुख्य कागदपत्र आहे.
मात्र,अमेरिका देशामध्ये एकसारखे केंद्रीकृत ओळखपत्र नाही. त्याऐवजी विविध उद्दिष्टांसाठी वेगवेगळे ओळखपत्रे वापरले जातात.चला,त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या ब्लॉग मध्ये जाणून घेऊया.
सोशल सेक्युरिटी नंबर (Social Security Number – SSN):
अमेरिकेमध्ये आधार कार्डसारखे काम करणारा सर्वात जवळचा कागदपत्र म्हणजे सोशल सेक्युरिटी नंबर (SSN). हा नऊ अंकी क्रमांक अमेरिकेच्या सोशल सेक्युरिटी प्रशासनाकडून (Social Security Administration) जारी केला जातो. हा मुख्यतः कर (tax) आणि सामाजिक लाभांसाठी वापरला जातो,पण अनेक वेळा ओळखीसाठीसुद्धा याचा उपयोग होतो. मात्र, हा क्रमांक आधार कार्ड प्रमाणे बायोमेट्रिक किंवा व्यापक उद्दिष्टांसाठी वापरला जात नाही.
ड्रायव्हिंग लायसन्स किंवा स्टेट आयडी (State ID):
अमेरिकेतील प्रत्येक राज्य ड्रायव्हिंग लायसन्स किंवा स्टेट आयडी कार्ड जारी करते, जे ओळख आणि पत्त्याचा पुरावा म्हणून वापरले जाते. हे भारतातील मतदार ओळखपत्र किंवा पॅन कार्ड यासारखे कार्य करते. दैनंदिन जीवनातील व्यवहारांसाठी हे प्रामुख्याने वापरले जाते.
पारपत्र (Passport):
आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी (Passport) हे अधिकृत ओळखपत्र असते. याशिवाय, अमेरिकेचे नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी देखील याचा उपयोग होतो. हे भारतातील पासपोर्टसारखेच असते.
ग्रीन कार्ड किंवा रोजगार अधिकृतता दस्तऐवज (Employment Authorization Document – EAD):
अमेरिकेचा नागरिक नसलेल्या लोकांसाठी ग्रीन कार्ड किंवा EAD ओळखपत्र म्हणून वापरले जाते. हे प्रामुख्याने अमेरिकेमध्ये काम करण्यासाठी आणि कायदेशीररित्या राहण्यासाठी ग्रीन कार्डचा वापर केला जातो.
Aadhaar Cardआणि SSN यामध्ये मुख्य फरक
- Aadhaar Card हे आपल्या भारत देशामध्ये अनेक सेवांशी जोडलेले आहे. जसे की बँक खाते, मोबाइल सिमकार्ड, सरकारी योजना इ.
- SSN मात्र मर्यादित उद्दिष्टांसाठी वापरले जाते. जसे की कर आकारणी आणि सामाजिक लाभ.
- आधार कार्डमध्ये बायोमेट्रिक (अंगठ्याचे ठसे व डोळ्यांचे स्कॅन) समाविष्ट असते.
- तर SSN फक्त क्रमांकावर आधारित असतो.
अमेरिकेमध्ये Aadhaar Card सारखी सर्वांना समान सुविधा देणारी कार्य प्रणाली नाही. मात्र सोशल सेक्युरिटी नंबर, ड्रायव्हिंग लायसन्स, आणि पारपत्र हे वेगवेगळ्या उद्दिष्टांसाठी वापरले जातात. भारत आणि अमेरिका यामध्ये नागरिकांच्या ओळख प्रक्रियेत हा मुख्य फरक आहे.
शेवटी निष्कर्ष काय तर,आम्ही आमच्या ब्लॉगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत नवनवीन माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. ज्याचा फायदा तुम्हाला तुमचे सामाजिक ज्ञान वाढवण्यासाठी तर होईलच, पण तुम्ही शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी जर फॉरेन मध्ये जाण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुम्हाला नक्कीच महत्त्वपूर्ण ठरेल.
तुमच्या मते,अमेरिकेला भारताच्या Aadhaar Card सारखी एकसंध प्रणाली लागू करायला हवी का? तुमचे मत marathipride.com या आमच्या साइट वरती कमेंटमध्ये नक्की कळवा.
@तुम्हाला ही माहिती कशी वाटली?
@तुम्हाला अजून कोणत्या नवीन विषयांवरती माहिती हवी असल्यास आम्हाला नक्की सांगा.
तुम्ही केलेल्या कमेंट्स या आमच्यासाठी खूप बहुमूल्य असतील जेणेकरून आम्हाला अशाच अनेक विविध प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यास मदत होईल.