Monday, November 18, 2024
spot_img
More

    How to Save Money on 2,000 plus Medicines : A Guide to Government’s Discount Scheme – सरकारच्या या योजने अंतर्गत आता मिळणार या 2000 पेक्षा जास्त औषधांवर मोठी सूट!!

    आज काल आपण सगळीकडे पाहतो प्रत्येक घरी डायबिटीस, थायरॉईड, ब्लड प्रेशर (Diabetis,Thyroid,Blood Pressure) यासारखे आजार असतातच.

    पण ज्या लोकांची आर्थिक परिस्थिती उत्तम आहे असे लोक चांगले डॉक्टर आणि लागणारी महागडी औषधे सहज घेऊ शकतात.पण सर्वसामान्य जनतेला खर्चिक डॉक्टर,महागडी औषधे घेणे परवडणारे नसते या कारणामुळे त्यांचे आजार वाढत जातात आणि त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या शरीरावरती होतो म्हणून ही परिस्थिती बदलण्यासाठी भारताच्या पंतप्रधानांनी प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजना जाहीर केली(PMBJP)

    सर्वसामान्य जनतेला कमी पैशात योग्य ती लागणारी औषधे उपलब्ध होण्यासाठी या योजनेचा फायदा होत आहे.

    आपण या ब्लॉगमध्ये ही योजना नेमकी काय आहे ते पाहणार आहोत. या योजनेत शासनाकडून उच्च दर्जाच्या जेनेरिक औषधांच्या किंमती बाजारभावापेक्षा कमी केल्या जात आहेत.

    सरकारने ठीक ठिकाणी जन औषधी स्टोअर्स स्थापन केले आहेत तेथे जेनेरिक औषधे उपलब्ध करून दिली जात आहेत. जेनेरिक औषधेही ब्रँडेड औषधे किंवा फार्मा औषधांपेक्षा स्वस्त आहेत परंतु तितकीच प्रभावी देखील आहेत. त्यांच्या गुणवत्तेत कोणतीही कमतरता नाही हे जनतेला समजावे यासाठी पंतप्रधान जन औषधी अभियान हे मुळात जनजागृती करण्यासाठी सुरू करण्यात आले आहे.

    तसेच ही जेनेरिक औषधे बाजारात उपलब्ध असतात ती सहज मिळू शकतात आणि विशेष म्हणजे ही औषधे सर्वसामान्य जनतेला बाजारामध्ये उपलब्ध असणाऱ्या औषधांच्या किमतीपेक्षा 60 ते 70 टक्के कमी किमतीत औषधे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार लवकरच देशभरात 1000 हून अधिक जण औषधी केंद्र उघडणार आहेत.

    कोणीही हे जन औषधी केंद्र सुरू करू शकता. हे जन औषधी केंद्र सुरू करण्यासाठी कोणती पात्रता आवश्यक आहे याची माहिती आम्ही तुम्हाला आमच्या पुढच्या ब्लॉगमध्ये देऊ.

    या योजनेअंतर्गत तुम्हाला कोणते फायदे मिळणार

    • औषधांच्या MRP Rate वरती 20% पर्यंत नफा मिळेल.
    •  या जन औषधी स्टोअरमधून कमी दरात औषधे उपलब्ध होणार आहेत.मात्र ही औषधे स्वस्त दरात उपलब्ध असतील तरी ती ब्रॅण्डेड औषधाप्रमाणेच प्रभावी सुद्धा आहेत.
    • सर्वसामान्य जनतेमध्ये औषधांबद्दल जागृकता निर्माण करणे त्यामुळे त्याचा फायदा त्यांची हेल्थ चांगली राहण्यासाठी होईल.
    • सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांना जेनेरिक औषधे लिहून देण्यासाठी प्रोत्साहित करणे.
    • काही रुग्णांना ठराविक औषधे दीर्घकालीन स्वरूपात घ्यावी लागतात पण त्यांच्या आर्थिक परिस्थितीमुळे ते त्यांना परवडणारे नसते म्हणून अशा रुग्णांना परवडणाऱ्या दरात औषधे उपलब्ध करून देणे.

    जन औषधी स्टोअर मध्ये उपलब्ध असणारी औषधे-

    अँटिबायोटिक्स, बीपी,कॅन्सर,डायबिटीस,पेन किलर, सर्दी, ताप,खोकला,एलर्जी,गॅस्ट्रो,विटामिन्स,फूड सप्लीमेंटस्. संपूर्ण लिस्ट साठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

    http://janaushadhi.gov.in/SortingView.aspx

    ही औषधे तुम्ही ऑनलाईन पण मागवू शकता-

    • त्यासाठी तुम्हाला जन औषधी सुगम (Jan Aushadhi Sugam)हे ॲप डाऊनलोड करावे लागेल.
    •  ॲप्लिकेशन डाऊनलोड झाल्यानंतर साइन अप करा नंतर नाव,पत्ता,मोबाईलनंबर,जन्मतारीख,वय,जिल्हा,राज्य यासारखी आवश्यक माहिती भरा.
    •  लॉगिन करण्यासाठी तुमचा पासवर्ड निवडा.
    • या ॲपच्या मदतीने तुम्ही तुमच्या ठिकाणाजवळ(Near To Your Location)जन औषधी केंद्र शोधू शकता.
    • एखादे औषध उपलब्ध आहे किंवा नाही,त्याची MRP किती आहे हे पाहू शकता.
    • एमआरपी वरून तुम्ही जेनेरिक आणि ब्रँडेड औषधांची तुलना करू शकता.

    आम्ही आमच्या Marathipride.com या वेबसाईट वरती जन औषधी केंद्र काढण्यासाठी कोणत्या अटी आवश्यक आहेत त्याची पात्रता काय आहे हे सांगणार आहोत.
    तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला ते comment मध्ये सांगा.ही माहिती तुम्ही तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर कर त्यामुळे ज्यांना याची गरज आहे त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येईल.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Latest Posts

    spot_imgspot_img

    Don't Miss

    Stay in touch

    To be updated with all the latest news, offers and special announcements.