Google Pay’s New Update –
आज काल आपण सगळीकडे पाहतो मग ते कॉलेज युवक असो किंवा मग वयस्कर माणसे असो किंवा लहान मुले या सर्व वयोगटातील लोकांना हॉटेलमध्ये जेवायला जायला,मित्रांच्या सोबत वेळ घालवून छान एन्जॉय करायला फार आवडते.मग ते Weekend Plan करतात किंवा मग एखादा Vacation Plan केला जातो.फूड(Food),एन्जॉयमेंट(Enjoyment) या सर्व गोष्टी सगळ्यांनाच छान वाटतात.तर कधी एखाद्या मित्र-मैत्रिणींचा वाढदिवस असेल तर त्यांच्यासाठी गिफ्ट घेण्यासाठी सर्वजण कॉन्ट्री काढतात मग अशावेळी आता मुख्य मुद्दा येतो तो खर्चाचा!!बिल पेमेंट(Bill Payment) चा.
सुरुवातीला पेमेंट कोणी करायचे?मग सर्वजण आपला हिस्सा देणार का?हा एक मोठा प्रश्नच असतो आणि म्हणून Google Pay ने एक नवीन वैशिष्ट्य आणले आहे.
ते नवीन वैशिष्ट्य काय आहे? त्याचा आपल्याला कसा उपयोग होणार?या सगळ्या गोष्टींची माहिती आम्ही तुम्हाला या ब्लॉगमध्ये देणार आहोत.
या वैशिष्ट्याच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मित्रांकडून शिल्लक रक्कम सहज घेऊ शकता आणि खर्च वाटून देण्याची process सोप्पी करू शकता.
Split Expenses ची वैशिष्ट्ये-
Split Expenses तुम्हाला तुमच्या मित्रांसह सर्व खर्च सेपरेट करण्याची परवानगी देते.
Google Pay ने Split Expenses या नावाचे नवीन वैशिष्ट्य (Features) सुरू केले आहे.
तुम्ही तुमच्या मित्रांसोबत पार्टी केली आणि तुम्ही बिल भरत असाल तर Google Pay तुमच्यासाठी आपोआप ती रक्कम वाटून देईल आणि तुमच्या मित्रांना वैयक्तिक Payment Request (Personal Payment Request) पाठवेल.
खर्चाचा मागोवा घेणे- Tracking expenses-
Google Pay ने काढलेल्या Split Expenses या वैशिष्ट्यामुळे बिले वाटून घेण्याचा एक सोयीस्कर मार्ग मिळाला आहे.
या सारखे इतर ॲप्स सुध्दा आहेत जे Extra Tracking आणि खर्च व्यवस्थापन क्षमता देतात.
परंतु आपण Google Pay वापरण्यास प्राधान्य दिल्यास आपल्याला ॲप मध्येच खर्चाचे Tracking घेता येईल.
Google Pay चे Split Expenses Feature कसे वापरावे?
- 1. तुमच्या स्मार्टफोनवर Google Pay App उघडा आणि नवीन पेमेंट(New Payment) वर टॅप करा.
- 2. पुढील स्क्रीनवर तुम्हाला एक नवीन ग्रुप तयार करण्यासाठी सर्च बार आणि पर्याय दिसतील.
- 3. नवीन ग्रुप तयार करण्यासाठी पर्यायांवर क्लिक करा आणि आपल्या मित्रांची नावे ॲड करा त्यानंतर नेक्स्ट (Next)वर क्लिक करा.
- 4. तुमच्या ग्रुप साठी नाव एंटर करा आणि ग्रुप तयार करण्यासाठी Create Group बटनावर टॅप करा
- 5. तुमचा Google Pay Group सेट करून तुम्ही आता तुमच्या मित्रांच्या सोबत खर्चाचे विभाजन करू शकता. स्प्लिट एक्सपेन्सेस (Split an Expense) बटनावर टॅप करा,खर्च केलेली एकूण रक्कम एंटर करा आणि Next वर टॅप करा.
- 6. Google Pay आपोआप रक्कम विभाजित करेल आणि प्रत्येकाला त्यांचे संबंधित हिस्सा देण्यासाठी सुचित करेल.
- 7. तुमच्या मित्राना Personal Payment Request करण्यासाठी Send Request बटनावर टॅप करा. तसेच पैशाचे विभाजन केल्यानंतर कोणत्या कामासाठी पैसे द्यावयाचे आहेत त्यासाठी तुम्ही एक नोट देखील लिहू शकता.
- 8. Google Pay सदस्याच्या पेमेंट बद्दल माहिती देत राहील आणि त्यानुसार पेमेंट update करेल.
अशाप्रकारे Google Pay ने काढलेल्या नवीन Split Expenses या वैशिष्ट्यामुळे आधी आपल्याला जो त्रास होत होता जसे की आपण मित्रांच्या सोबत फिरायला गेलो किंवा पार्टी केली तर आपल्याला पैशाचे विभाजन करणे हे त्रासदायक होते तो त्रास आता होणार नाही.
इतर विशिष्ट खर्च Tracking ॲप्स उपलब्ध असले तरी Google Pay ची कार्यक्षमता तुमच्या कॉमन खर्चाचे व्यवस्थापन करण्यासाठी एक सोयीस्कर पर्याय आहे.
Source –
https://support.google.com/pay/india/answer/11420982?hl=en
पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा तुमच्या मित्रांसोबत बाहेर जाल तेव्हा Google Pay चा या नवीन वैशिष्ट्याचा वापर करा, जेणेकरून तुम्हाला कायमस्वरूपी आठवणी तयार करण्यावर लक्ष केंद्रित करता येईल आणि बिलाची चिंता वाटणार नाही.
आमचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला comment मध्ये नक्की सांगा. ही महत्वपूर्ण माहिती तुम्ही तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर करा. अशाच नवीन महत्त्वपूर्ण माहितीसाठी खाली दिलेल्या व्हाट्सअप चिन्हा वरती जाऊन आमचा
marathipride.com हा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.