महाराष्ट्र शासनाच्या इतर मागास व बहुजन कल्याण विभागाची महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) स्वायत्त संस्था आहे.
महाराष्ट्रातील इतर मागासवर्ग, विभक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धा युगात हव्या तशा संधी प्राप्त व्हावी याकरता ही संस्था विविध योजना राबवत असते.
2023-24 साठी महाज्योति तर्फे MPSC आणि UPSC परीक्षा पूर्व प्रशिक्षणाकरिता अर्ज मागविण्यात येत आहेत.
एमपीएससी परीक्षा पूर्व प्रशिक्षण
एमपीएससी परीक्षा पूर्व तयारीसाठी मोफत ऑफलाइन पद्धतीने महाज्योती मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी अनिवासी पद्धतीने प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
प्रशिक्षणाचा नियोजित कालावधी 11 महिने आहे.
महाज्योतीच्या धोरणानुसार प्रत्यक्ष प्रशिक्षणास 75 टक्के उपस्थिती असणाऱ्यांनाच दर महा 10,000/- रुपये विद्या वेतन लागू होईल. एक वेळ आकस्मिक खर्च 12,000/- रुपये देण्यात येईल.
यूपीएससी परीक्षा पूर्व प्रशिक्षण
यूपीएससी परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना एकूण 11 महिन्याचे पूर्व आणि मुख्य तसेच व्यक्तीयमत्व चाचणी परीक्षा करता दिल्ली येथील नामांकित प्रशिक्षण संस्थेमार्फत प्रशिक्षणासोबत अभ्यास साहित्य घरपोच देण्यात येईल.
पुणे येथील प्रशिक्षणाकरिता निवास व भोजन व्यवस्था म्हणून उमेदवारांना रु. 10,000/- प्रतिमहा विद्या वेतन व एकवेळ आकस्मिक खर्च रु. 12,000/- हजार रुपये देण्यात येणार आहे.
दिल्ली येथील ऑफलाईन प्रशिक्षणाकरिता निवास व भोजन व्यवस्था म्हणून उमेदवारांना रु. 13,000/- प्रतिमाह वेतन व एक वेळ 18,000/- रुपये आकस्मिक खर्च देण्यात येईल.
आवश्यक कागदपत्रे
1. आधार कार्ड
2. जातीचे प्रमाणपत्र
3. रहिवासी दाखला
4. वैध नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र
5. पदवीचे प्रमाणपत्र
6. अंतिम वर्षात शिकत असलेले विद्यार्थी त्यांचे मागील वर्ष उत्तीर्ण झालेले गुणपत्रक.
7. बँक पासबुक किंवा कॅन्सल केलेला चेक
या प्रशिक्षणाकरिता इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी महाज्योतीच्या http://www.mahajyoti.org.in या वेबसाईटवर जाऊन एप्लीकेशन ट्रेनिंग 2023-2024 यावर जाऊन दिलेले सर्व नियम आणि अटींचे पालन करावे आणि नंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
ऑनलाइन अर्ज करण्याची तारीख 10 एप्रिल पर्यंत आहे.
10 एप्रिल पर्यंत इच्छुक विद्यार्थ्यांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावे.
तुम्हाला या महत्त्वाच्या बातमीबद्दल काही शंका असल्यास आमच्या marathipride.com या वेबसाईटवर कमेंट करून सांगा. अधिकाधिक महत्त्वाच्या बातम्या, शासनाच्या योजना याबद्दल माहिती जाणून घेण्यासाठी आमचा व्हाट्सअप ग्रुपला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा