Sayajirav Gaikwad Sarathi Scholarship Scheme for Maratha Students –
आपल्या समाजातील अनेक विद्यार्थ्यांना हुशार असून देखील आर्थिक अडचणीमुळे उच्च शिक्षणासाठी परदेशी जाण्याची संधी मिळत नाही.याचा परिणाम म्हणजे जे चांगल्या दर्जाचे उच्च शिक्षण परदेशात मिळते ते त्यांना आर्थिक अडचणीमुळे घेता येत नाही. पण याचा अर्थ असा नाही की, आपल्याकडे चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळत नाही. नवीन टेक्नॉलॉजी,इक्विपमेंट्स यांचा वापर परदेशात जास्त चांगल्या प्रकारे होत असले कारणाने आपल्या विद्यार्थ्यांना जास्त चांगल्या प्रकारे शिक्षण घेता येते आणि नवनवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळते. त्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांना आपल्या देशात करता येईल.
या ब्लॉगमध्ये आपण पाहणार आहोत-
1.शिष्यवृत्ती कोणाला मिळणार?
2. कोणत्या फिल्ड साठी शिष्यवृत्ती मिळणार.
3. दरवर्षी किती विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती चा लाभ घेता येणार.
या सर्व बाबींचा विचार करून QS World Ranking मध्ये 200 च्या आत मध्ये मानांकन असलेल्या शैक्षणिक संस्था किंवा विद्यापीठांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती चा लाभ मिळणार आहे.
ही योजना याच वर्षापासून म्हणजेच 2023-24 पासून राबवण्यात येणार आहे.
“सयाजीराव गायकवाड सारथी” शिष्यवृत्ती योजनेला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता मिळाली आहे. या योजनेअंतर्गत राज्यातील मराठा,कुणबी,मराठा-कुणबी, कुणबी-मराठा या जातीतील गुणवत्त विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे.
योजनेअंतर्गत दरवर्षी 75 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. या योजनेसाठी 5 वर्षाकरिता 275 कोटी रुपये खर्च होईल,अशी अपेक्षा आहे.त्यामधील पहिल्या वर्षासाठी 25 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता मिळाली आहे.
यामध्ये अभियांत्रिकी(Engineering), व्यवस्थापन (Management),विज्ञान (Science),अर्थशास्त्र,औषध निर्माण,कॉमर्स,आर्ट्स,वास्तुकला(Architecture) या अभ्यासक्रमासाठी 50 पदव्युत्तर आणि पदवी,पदविका आणि 25 डॉक्टरेट अश्या प्रकारच्या अनेक फिल्डमध्ये शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.
हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला Comment मध्ये नक्की सांगा.ही महत्त्वपूर्ण माहिती तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा.अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी खाली दिलेल्या व्हाट्सअप चिन्हावरती क्लिक करून आमचा Marathipride.com हा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.