काल सोशल मीडियावर एक भन्नाट व्हिडिओ व्हायरल झाला. दोन सैनिक अत्यंत गंभीर चेहऱ्याने ड्रोनद्वारे मिसाईल लाँचिंगचं प्रात्यक्षिक दाखवत होते. सर्व तयारी एकदम फुल टू परिपूर्ण – शस्त्र सज्ज, ड्रोन रेडी आणि वातावरणात “मिशन सक्सेसफुल”चा आत्मविश्वास!
पण, नियतीला काहीतरी वेगळंच मंजूर होतं!
जसंच त्यांनी ड्रोन उडवायला सुरुवात केली, तसंच त्या बिचाऱ्या ड्रोनने सरळ कट मारला आणि… “धडाक्क्क्क्क्क!”

ड्रोन उडण्याऐवजी सैनिकाच्या पायातच फुटला!
ना ड्रोन उडाला, ना मिसाईल सोडली गेली… आणि वरून ‘ होत्याचे चे नव्हतं होऊन गडबड उडाली.

ड्रोन ऑपरेशनसाठी लक्ष, एकाग्रता आणि तयारी लागते म्हणतात; पण इकडे बिचाऱ्यांना लागलं फक्त ‘पायावर’!
आता पुढच्या वेळी ड्रोन सोडताना बहुतेक “सेफ्टी शूज”चा वापर अनिवार्य करायला लागेल!
जगाला दाखवायचं होतं युद्धकौशल्य… पण जगाने बघितलं, ‘ड्रोन – पायाला शरण’!