आता TRAI म्हणजेच भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने घेतलाय एक भन्नाट निर्णय! तुमचं काम फक्त कॉल आणि एसएमएसचं आहे का? मग या नव्या प्लॅनमुळे उगाच डेटाच्या रीचार्जसाठी पैसे खर्च करण्याचं ओझं नाही. चला, बघूया या नव्या प्लॅनमध्ये काय काय खास आहे.
काय आहे ह्या नव्या प्लॅनमध्ये?
1. डेटा नको, हवी तेवढीच सेवा:
पूर्वी कसं होतं, डेटा लागत नसला तरी डेटाचा प्लॅन घ्यवा लागत होता. पण आता, फक्त कॉल आणि एसएमएससाठी येईल नवा प्लॅन.
उदाहरण:
बबनची आई: “मला फक्त मुलाशी बोलायचंय, व्हॉट्सअॅप कळत नाही हो! हा प्लॅन माझ्यासाठी बरा.”
तात्या : “माझ्या गिऱ्हाईकांना गुळाचा भाव सांगायचाय मग त्यासाठी, डेटा कशाला?”
2. खिशाला परवडणारा रिचार्ज :
आता कमी पैशात मस्त सेवा मिळणार. 10 चा छोटा रिचार्ज करा आणि मनसोक्त बोला.
उदाहरण:
शंकर: अरे राजू माझ्या फोनवर 10 चा छोटा रिचार्ज कर, मला शेळीवाल्याशी बोलायचंय.
म्हाळू दादा: “गावातल्या मंडळाची बैठक बोलवायची आहे, आता एका फोनवर काम होतंय.” मग डेटा कशाला पाहिजे.
3. खूप दिवस टिकणारं रिचार्ज:
आता रिचार्जची वैधता 365 दिवसांपर्यंत असेल!
उदाहरण:
आप्पा : “आता एका रिचार्जने वर्षभर टेन्शन नाही. पोरग हाय मुंबईला, एकदाच वर्षाचं रिचार्ज मारतय की परत तिकडे बघायचंच नाही.”
गंगाराम: “शेणखताचं भाव सांगण्यासाठी फक्त फोन करतो, डेटा नको.”
4. रू 10 पासून टॉप-अप:
कमी बजेटवाल्यांसाठी ₹10, ₹20, ₹50 असे पर्याय.
उदाहरण:
आजी दुकानात म्हणतील, पोरा तेवढे 10 चा रिचार्ज कर लेकी बरोबर थोडं बोलायचं.
संपत: मी हाय बाबा शेतकरी मला कशाला लागतो डेटा आपला ऊस तोड वाल्याला लावला फोन लावला की तो येतो टोळी घेऊन.
गावकऱ्यांसाठी खास योजना
गावात बऱ्याच लोकांना इंटरनेटची गरज नसते, तसेच गावातील काही लोकांना अनावश्यक इंटरनेटसाठी पैसे खर्च करणे परवडत नाही.
उदाहरण:
शालूबाई: “सखूबाईंना विचारायचंय, भाजीपाल्याचा भाव काय?” पोरी तेवढं नंबर दाबून मला कॉल लावून दे.
राम्या पाटील: “भाऊला लग्नाला बोलवायचंय, मग नुसता फोन केला की झालं.”
कधी सुरू होणार हे?
जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया लवकरच हे प्लॅन बाजारात आणतील. हा TRAI चा निर्णय ग्राहकांसाठी सोनेरी संधी आहे. डेटा ची गरज नसणाऱ्यांना आता स्वस्त आणि मस्त पर्याय मिळणार आहेत.
“तर मंडळी, आता विसरा डेटा, कारण TRAI ने दिला आहे आनंद मोठा!”