A Salute to the Courage of Railway Employees – रेल्वे कर्मचाऱ्यांच्या धाडसाला सलाम
आपल्या धावपळीच्या आयुष्यात कोणाला कोणासाठीच वेळ नसतो. आज कालच्या जगात वाढते कॉम्पिटिशन, वाढत्या गरजा त्यासाठी लागणारा पैसा कमावण्यासाठी लोकांची फार धावपळ होत असते. पण या धावपळीत आपण मुक प्राण्यांच्या वर कळत नकळत अन्याय करत असतो. एखादा मुक पशु कोणत्या अडचणीत असेल, तर आपण त्याला वाचवण्यासाठी जात नाही कारण काही लोकांना प्राण्यांच्या बद्दल तेवढे प्रेम, आपुलकी, जिव्हाळा वाटत नाही.
पण प्राणी ही जात अशी आहे की ते तुम्ही एकदा जीव लावला तर ते तुमच्यासाठी वेळे प्रसंगी स्वतःचा जीव पण गमावतील. अशी खूप सारी उदाहरणे आपण पाहिलेली आहेत. अशाच एका पशुप्रेमी आणि माणुसकीचे जिवंत उदाहरण या रेल्वे कर्मचाऱ्यांनी (Railway Staff)दाखवून दिले आहे.
भरधाव वेगात Train येत असताना रेल्वे रुळाखाली (Railway rule)एका कुत्र्याचा(Dog) पाय अडकला होता. आपला अडकलेला पाय काढण्यासाठी त्या श्वानाची(Dog) खूप धडपड चालू होती. पण काही केल्या त्याला पाय(Leg) काढणे जमतच नव्हते. तो जीवाच्या आकांताने ओरडत होता. पण स्वतःच्या जीवाची परवा न करता या रेल्वे कर्मचाऱ्यांनी(Railway Staff) त्या श्र्वानाचा(Dog)पाय सुखरूप बाहेर काढला. अशा जीवन मरणाच्या परिस्थितीत त्या श्वानासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या रूपात देवदूतच धावून आले असे म्हणता येईल.
रेल्वे कर्मचाऱ्यांनी(Railway Staff) स्वतःच्या जीवाची बाजी लावून कशाप्रकारे त्या श्वानाचा जीव वाचवला ते तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकता.