सावधान! धबधब्यावर फिरायला जाताय? मग ‘हा’ धक्कादायक Video एकदा पाहाच –
आपल्या सर्वांनाच फिरायला जायला खूपच आवडते मग ते कोणत्याही ऋतूमध्ये असो. आपण फिरायला जायला नेहमीच उत्साही आणि आनंदी असतो. वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला गेल्यामुळे आपल्याला नवनवीन लोक भेटतात, त्यांची वेगळी संस्कृती जाणून घेता येते. या सर्व गोष्टीतून आपल्याला खूप काही शिकायला मिळते. कडक उन्हाळा संपला की पावसाच्या सरींची चाहूल लागते. एकदा का पावसाळा सुरू झाला म्हणजे सगळे वातावरणच बदलून जाते. पावसाळ्यात फिरायला जाण्याची मज्जा काही वेगळीच असते!!
तुम्ही जर पावसाळ्यात फिरायला जायचा विचार करत असाल तर अल्हाददायक हवामान आपल्या Vacations ला अजून जास्त छान बनवते. आजकाल पावसाळा सुरू झाल्यानंतर बरेच लोक Weekend ला मुलांना घेऊन धबधबा(Waterfall) एन्जॉय करताना दिसतात. बऱ्याच लोकांना ट्रेकिंगला(Treking) सुद्धा जायला आवडते. लोकांच्या या आवडीमुळे पावसाळ्यात ठीक ठिकाणी खूप जास्त गर्दी असते. जर अशा गर्दीत जायचे असेल तर काळजी तर नक्कीच घ्यायला हवी. पावसाळ्यात फिरायला गेल्यानंतर आजूबाजूचे वातावरण, हिरवळ, वाहणारा धबधबा पाहून फोटो काढण्याचा मोह सगळ्यांनाच होतो. आजकाल सेल्फीचे फॅड आले आहे त्यामुळे आजकालची तरुण पिढी आपला जीव धोक्यात घालून सेल्फी काढताना दिसतात आणि त्या सेल्फी काढताना अनेक प्रकारच्या दुर्घटना घडल्या आहेत त्याचे व्हिडिओ सुद्धा आपण पाहिले आहेत.
आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्हिडिओ बद्दल सांगणार आहोत. पावसाळ्याचा आनंद घेण्यासाठी एक ग्रुप ट्रेकिंगला गेला होता. पण पाऊस अचानक वाढल्यामुळे पाण्याची पातळी सुद्धा वाढली आणि त्यांना तेथून बाहेर काढण्यासाठी पाण्याच्या मध्ये दोरी टाकून दुसऱ्या बाजूने सगळ्यांना ओढून घ्यावं लागलं. दुसऱ्या बाजूने सगळ्यांना ओढून घेत असताना या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता एका मुलीला वाचवताना एक युवक स्वतःच पाण्यामध्ये वाहून गेला अशावेळी त्याच्या सोबत जी लोकं होती त्यांना ही त्याला वाचवता आले नाही. असा हा थरकाप उडवणारा व्हिडिओ आहे. त्यामुळे अशा ठिकाणी फिरायला जाऊन स्वतःचा व आपल्या प्रियजनांचा जीव धोक्यात घालू नका.
या ब्लॉगच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला जागरूक करण्याचा प्रयत्न करत आहोत, कारण आयुष्य हे एकदाच मिळते त्याची कदर नाही केली तर आपल्या चुकीमुळे अशा घटना घडतात. त्यामुळे फिरायला जाताना आपण कुठे फिरायला जातोय? तिथे सेफ्टी किती आहे?याचा विचार नक्कीच करा.
अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी खाली उजव्या बाजूला दिलेल्या चिन्हावरती क्लिक करून आमचा Marathi pride.com हा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.