महाराष्ट्र सरकारच्या मोफत गणवेश योजना – 2023 बद्दल सर्व काही जाणून घ्या Know all about Government of Maharashtra Free School Uniform Scheme 2023
आज काल जवळपास सगळ्याच शाळेतल्या विद्यार्थ्यांना (School Uniform) गणवेश हा सक्तीचा असतोच. मग काही पालकांना आपल्या मुलांना School uniform गणवेश घेऊन देण्यासाठी खूपच तडजोडी कराव्या लागतात.अशा परिस्थितीत तडजोडी करून देखील मुलांना एकच जोड गणवेशाचा मिळतो, मग त्यांना तोच गणवेश आठवडाभर वापरावा लागतो. अशामुळे मुलांची मानसिकता बदलते,शाळेत हुशार असून देखील या कारणामुळे मुले शाळेत जाण्यास नकार देतात.
आपल्या राज्याचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सर्व मुले शाळेत जाऊन साक्षर होणे गरजेचे आहे.या सर्व बाबींचा विचार करून महाराष्ट्र राज्य सरकारने शालेय विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी घोषणा केली आहे. या योजनेसाठी शासन निर्णय सुद्धा जाहीर करण्यात आला आहे.
हा शासन निर्णयाला 6 जुलै 2023 रोजी मान्यता देण्यात आली आहे.या योजनेअंतर्गत शासकीय तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील इयत्ता 1ली ते 8 वी पर्यंतच्या वर्गातील सर्व मुला-मुलींना तसेच अनुसूचित जाती व जमातीच्या मुलांना,दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले यांना (Free School uniform) मोफत गणवेशाचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
शासन निर्णयाप्रमाणे या योजनेअंतर्गत मुलांना प्रत्येकी दोन गणवेश, एक जोडी बूट आणि दोन जोडी पाय मोजे यांचा लाभ मिळणार आहे. तसेच या योजनेचा फायदा दारिद्र्यरेषेखालील मुलांना तर होणारच आहे पण या योजनेपासून वंचित राहणाऱ्या इतर प्रवर्गातील दारिद्र्यरेषेवरील पालकांच्या मुलांना दरवर्षी दोन मोफत गणवेश उपलब्ध करून देण्यास मान्यता प्राप्त झाली आहे.
या योजनेची अंमलबजावणी 2023-24 पासून करायची असल्याने (Free School Uniform) मोफत गणवेश योजनेपासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना 2 गणवेश उपलब्ध करून देण्याकरता प्रति विद्यार्थी 600/-रुपये प्रमाणे 2023-24 या आर्थिक वर्षाकरिता एकूण ७५.६० कोटी तसेच
सर्व पात्र विद्यार्थ्यांना एक जोडी बूट व दोन जोडी पायमोजे उपलब्ध करून देण्याकरता प्रति विद्यार्थी 170/- रुपये याप्रमाणे एकूण 82.92 कोटी इतका निधी खर्च करण्याची मान्यता मिळाली आहे.
महाराष्ट्र सरकारचा GR बघण्यासाठी खाली क्लिक करा
https://gr.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202307061706315021…..pdf
अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी उजव्या बाजूला दिलेल्या व्हाट्सअप चिन्हा वरती क्लिक करून आमचा Marathipride.com हा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.