मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील टोल दरात 18 टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. शनिवारी 1 एप्रिल पासून टोलचे नवे दर लागू होणार आहेत त्यामुळे वाहन चालकांच्या खिशाला 50 ते 330 पर्यंत ची अधिक झळ सोसावी लागणार आहे.
मुंबई पुणे महामार्गावरील 2004 साली टोल आकारणी सुरू करताना दर तीन वर्षांनी टोलच्या दरात 18 टक्क्यांनी दर वाढ करण्याचा निर्णय झाला होता.
त्यानुसार एप्रिल 2023 मधील टोलच्या दरात वाढ होत आहे. १ एप्रिल 2023 रोजी लागू होणारे टोलचे दर हे 2030 पर्यंत कायम राहतील असे एम.एस.आर.डी.सी कडून सांगण्यात आले आहे.
नवीन टोल दर पुढील प्रमाणे –
वाहतूक व्यवस्थापनाची यंत्रणा नसताना इतक्या मोठ्या प्रमाणात टोल दर वाढीवरून नाराजी व्यक्त होत आहे.
महाराष्ट्र राज्य वाहन चालक मालक व प्रतिनिधी महासंघाचे मुख्यमंत्र्यांना पत्र.
कोरोना व इतर आर्थिक संकटातून माल, प्रवासीवाहतूकदार सावरत असताना महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून केलेली टोल दरवाढ अन्यायकारक आहे या दरवाढीचा विचार व्हावा असे आवाहन करणारे पत्र महाराष्ट्र राज्य वाहन चालक-मालक व प्रतिनिधी महासंघाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठविले आहेत