Tuesday, December 3, 2024
spot_img
More

    आत्ताच बुक करा TATA Stryder E-cycle आणि मिळवा मोठा Discount.

    TATA Stryder E-cycle

    आज काल आपण पाहतोय पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत आणि त्या दरात वाढ ही होतच राहणार आहे. त्यामुळे आता इलेक्ट्रिक वाहनाची(Electric Vehicles)मागणी वाढताना दिसत आहे. बरेच लोक इलेक्ट्रिक व्हेईकल घेण्याला पसंती देत आहेत. डिझेल,पेट्रोल वरती चालणाऱ्या वाहनांच्या अतिवापरामुळे पर्यावरणाचे प्रदूषण देखील मोठ्या प्रमाणात होते याचा परिणाम आपल्या आरोग्यावरती होत आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल (Electric Vehicles) मुळे इंधनाची बचत तर होतेच आणि प्रदूषण ही कमी होते त्यामुळे नागरिकांनी स्वतःच्या व आपल्या प्रियजनांच्या आरोग्यासाठी इलेक्ट्रिक व्हेईकल वापरण्याला प्राधान्य दिले पाहिजे.

    याच कारणामुळे केंद्र सरकारकडून शून्य प्रदूषण करणाऱ्या इलेक्ट्रिक व्हेईकलच्या निर्मितीला प्रोत्साहन देण्याचे धोरण राबवले जात आहे आणि ते सर्व नागरिकांच्या दृष्टीने फायद्याचे देखील आहे. अलीकडेच इलेक्ट्रिक व्हेईकल मध्ये चार चाकी गाड्यांचे प्रमाण वाढत तर आहेत पण OLA सारख्या बाईक सुद्धा खूप जास्त प्रमाणात दिसून येत आहेत.

    अशातच आता टाटा कंपनीने (TATA Company) ने इलेक्ट्रिक सायकल (Electric Cycle) सुद्धा बाजारात आणली आहे.

    चला तर मग आपण या टाटाच्या इलेक्ट्रिक बाइसिकल बद्दल जाणून घेऊयात. आजकाल आपण पाहतो हेल्थ फिटनेस (Health Fitness) साठी लोक सायकलिंग (Cycling) करण्याला पसंती देत आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक सायकलची(Electric Cycle)मागणी वाढली आहे. त्यामुळे अनेक नामांकित कंपन्या इलेक्ट्रिक सायकलचे नवनवीन मॉडेल बाजारात आणत आहेत. रतन टाटा यांचे टाटा इंटरनॅशनल लिमिटेड कंपनी (Tata International Ltd Company) आहे. यांच्या Stryder या कंपनीने नवीन इलेक्ट्रिक सायकल बाजारात आणली आहे.

    Stryder या कंपनीने पुरुष आणि महिलांसाठी इलेक्ट्रिक सायकलची नवीन रेंज बाजारात आणली आहे. या इलेक्ट्रिक सायकल ला Zeeta Plus e-bike हे नाव देण्यात आले आहे.ही सायकल वापरण्यासाठी एकदम टिकाऊ आणि सर्व वयोगटासाठी सुरक्षित आहे.दिसायला एकदम स्टायलिश अशी आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रदूषण कमी करण्यासाठीचा हा एक उत्तम पर्याय आहे.

    Battery and Power बॅटरी आणि पॉवर-

    1. या सायकलची बॅटरी एकदा फुल चार्ज झाल्यानंतर ही सायकल 30 किलोमीटर पर्यंत अंतर पार करते.टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रति तास आहे.
    2. महत्त्वाचे म्हणजे ही सायकल ची बॅटरी तीन ते चार तासातच पूर्ण चार्ज होते ते 10 पैसे प्रति किलोमीटर एवढाच खर्च येतो
    3. या सायकल चा 216Wh च्या energy output सह 36v-6ah एवढा बॅटरी पॅक आहे.
    4. विशेष म्हणजे या सायकलला ट्रान्सपोर्टचा काहीच प्रॉब्लेम येत नाही कारण ही सायकल कोणत्याही ट्रेनमध्ये सहज चढू शकते.

    किंमत किती आहे – Tata stryder cycle Price ?

    1.ही सायकल जे कस्टमर सुरुवातीला बुकिंग करतील अशा Lucky customer त्यांच्यासाठी 26995/-रुपये आहे.

    2. नंतर या सायकलची किंमत 6000 रुपयांनी वाढेल.

    3.कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरून देखील ही सायकल खरेदी करू शकता.

    तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला Comment मध्ये नक्की सांगा.अशाच नवनवीन आणि महत्वपूर्ण माहितीसाठी उजव्या बाजूला दिलेल्या चिन्हावरती क्लिक करून आमचा Marathipride.Com हा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा..

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Latest Posts

    spot_imgspot_img

    Don't Miss

    Stay in touch

    To be updated with all the latest news, offers and special announcements.