Toyota ने अलीकडेच भारतात अर्बन क्रूझर टायसर (Urban Cruiser Taisor) नेमप्लेटचे ट्रेडमार्क केले आहे. Maruti सर्वाधिक विक्री होणाऱ्या मॉडेल, Fronx वर ही कार आधारित आहे.
3 एप्रिलला ही कार भारतात लाँच होईल. भारतीय मार्केटमध्ये ही कार Tata Punch आणि Maruti Suzuki Fronx ला सरळ टक्कर देईल.
Maruti Suzuki ची Fronx SUV आता रिबॅज स्वरूपात Toyota च्या ब्रँड ने विकली जाईल. लुक्स आणि फीचर्स बाबतीत टोयोटा ने काही महत्त्वपूर्ण बदल या गाडीमध्ये केले आहेत. यापूर्वी मारुतीची ब्रेझा टोयोटाने अर्बन क्रूजर म्हणून, मारुतीची Eartiga टोयोटा ने Rumion म्हणून आणि लेटेस्ट मध्ये मारुतीने टोयोटाची इनोव्हा ही गाडी इनव्हिक्टो म्हणून बाजारात आणली आहे.
नवीन Urban Cruiser Taisor मुळे टोयोटाच्या विक्रीत वाढ होण्याची शक्यता आहे कारण त्याची किंमत सुमारे रु. 7.7-7.8 लाखने सुरू होऊ शकते.
Urban Cruiser Taisor ही गाडी फ्रॉन्क्स सारखेच इंजिन मध्ये पर्याय देते. यामध्ये 1.2-लिटर पेट्रोल इंजिन समाविष्ट आहे, जे 80% पेक्षा जास्त Fronx खरेदीदारांमध्ये लोकप्रिय आहे आणि टोयोटा 1.0-लिटर बूस्टरजेट टर्बो-पेट्रोल इंजिन देखील देऊ शकते. टोयोटा बूस्टरजेटच्या पुढे गेल्यास, भारतात विकल्या जाणाऱ्या त्यांच्या कारमध्ये टर्बो-पेट्रोल इंजिन सादर करण्याची ही पहिलीच वेळ असेल.
नवीन मारुती सुझुकी Fronx CNG चे मॉडेल 8.41 लाख ने विक्री साठी सुरू होते आणि ती सध्या चांगली कामगिरी करत आहे. टोयोटा Taisor ची CNG मॉडेल सादर करू शकते. यात लक्षवेधी क्रिस्टल ब्लॉक पॅटर्न एलईडी डीआरएलसह एलईडी हेडलाइट्स आणि टेललाइट्स आहेत. याव्यतिरिक्त, हे Nexwave grille, sloped roof आणि पूर्णपणे एलईडी कनेक्टेड RCL सह येते. एकूणच, ही कार बजेट-मधील ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय आहे.