Monday, January 6, 2025
spot_img
More

    लाडक्या बहिणींचा प्रश्न सुटला,आता शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच काय? कधी मिळणार कर्जमाफी? सविस्तर वाचण्यासाठी क्लिक करा.

    आज आपण आपल्या जगाचा पोशिंदा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकरी  बांधवांबद्दल सर्वात महत्त्वाचा विषय असलेल्या कर्जमाफी, या बद्दल ची सर्व माहिती या ब्लॉग मध्ये जाणून घेणार आहोत.

    शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची गरज –

    महाराष्ट्रातील आपल्या शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेक वर्षापासून शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत, त्याचे कारण खराब हवामान,अनियमित पाऊस, कोरडा दुष्काळ,बाजारपेठेतील बाजारभावात होणारी घसरण,शेतीसाठी घेतलेले कर्ज त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.अशा परिस्थितीत कर्जमाफी ही शेतकऱ्यांसाठी एक दिलासा मिळतो.

    कर्जमाफीची घोषणा आणि त्यातील येणाऱ्या अडचणी-

    1. सरकारच्या घोषणा- 2019 पासून सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफीसाठी अनेक घोषणा केल्या आहेत. नवीन सरकारने ही शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक कर्जमाफीची घोषणा केली.परंतु या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी  शेतकऱ्यांना मात्र अनेक अडथळ्यांना  सामोरे जावे लागत आहे.

    2. कर्जमाफीच्या अंमलबजावणीतील समस्या –

    बँकांचे निकष: बँकांनी कर्ज पुनर्रचना केली असल्यास किंवा जुने थकीत कर्ज असल्यास कर्जमाफी लागू होत नाही.

    अधिकारी प्रक्रियांचा गोंधळ : कर्जमाफीची प्रक्रिया किचकट असल्याने बँक अधिकाऱ्यांकडून योग्य ती मदत वेळेत केली जात नाही त्यामुळे शेतकऱ्यांना वेळेत लाभ मिळत नाही.

    तांत्रिक समस्या : कर्जमाफीची जी प्रक्रिया आहे ती ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात येत आहे. त्यामुळे ऑनलाइन प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येतात.

    योजनेचा अपुरेपणा: शेतकऱ्यांसाठी असणाऱ्या योजना या सर्व शेतकऱ्यांना लागू होत नाहीत त्यामुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहतात.

    कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांच्या सामान्य समस्या-

    1. बँकांकडून सहकार्याचा अभाव- शेतकऱ्यांच्या अर्जांना बँकांकडून हवा तसा सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही.

    2. कागदपत्रांचा अपुरा पुरवठा कर्जमाफीसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे वेळेत उपलब्ध होत नाहीत.

    3. पुरेशी माहिती नसणे आपल्या शेतकरी बांधवांना कर्जमाफी या प्रक्रियेची आणि पात्रतेची पूर्ण माहिती नसते.

    4. भ्रष्टाचार : काही ठिकाणी कर्जमाफी योजनांमध्ये भ्रष्टाचाराचा आरोप होतो ज्यामुळे पात्र शेतकरी योजनेपासून वंचित राहतात.

    समस्या सोडवण्यासाठी उपाय-

    1. सरळ प्रक्रिया- कर्जमाफी अर्जाची प्रक्रिया सरळ आणि सोपी ठेवावी जेणेकरून प्रत्येक शेतकरी त्याचा लाभ घेऊ शकेल.
    2. बँकांसाठी सक्तीचे निर्देश- बँकांना शेतकऱ्यांच्या अर्जांना तात्काळ प्रक्रिया करण्याचे निर्देश दिले जावेत.

    3. तांत्रिक सुधारणांचा अवलंब- तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा तसेच डिजिटल प्लॅटफॉर्म अधिक सुगम बनवावे.

    4. प्रशिक्षण आणि जागरूकता-   शेतकऱ्यांना कर्जमाफी प्रक्रियेबद्दल माहिती देण्यासाठी गावोगावी शिबिरे आयोजित करावीत जेणेकरून शेतकऱ्यांना नेमकी योजना काय आहे? याबद्दल सविस्तर माहिती मिळेल आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांना कर्जमाफी योजनेचा फायदा घेता येईल.

    5. शासनाची काटेकोर देखरेख कर्जमाफी योजनेमध्ये योग्य ती अंमलबजावणी होत आहे किंवा नाही  यावर शासनाने कठोर देखरेख ठेवणे.

    कर्जमाफी हा उपाय आहे का?

    कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी तात्पुरता दिलासा देऊ शकते.पण हे दीर्घकालीन समाधान नाही.शेतीत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, बाजार व्यवस्थापन सुधारणा,सिंचन व्यवस्थेचा विस्तार आणि व्याजदर सवलती सारख्या उपाययोजना शेतकऱ्यांच्या समस्या कायमस्वरूपी सोडवू शकतात.

    सर्वांच्या मनाला भावणारा विचार-

    शेतकऱ्यांना कर्जमाफी देणे ही सरकारची जबाबदारी आहे परंतु रात्रंदिवस शेतात कष्ट करून जो शेतकरी उत्पन्न काढतो पण येणारे उत्पन्न हे बऱ्याचदा हवामानाच्या बदलांवरती अवलंबून असते. त्यामुळे हाता-तोंडाशी आलेला घास शेतकऱ्यांना गमवावा लागतो.आलेल्या उत्पन्नाचा शेतकऱ्यांना हवा तसा फायदा होत नाही. त्यामुळे आर्थिक अडचणींचा, कुटुंबाचा उदरनिर्वाह अशा अनेक समस्याचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. अशातच काही शेतकरी हतबल होवून आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलतात. अशी अनेक उदाहरणे महाराष्ट्रात घडून गेली आहेत.म्हणूनच आपल्या शेतकरी बांधवांना स्वावलंबी बनवण्यावर ही लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.त्यामध्ये आधुनिक शेती तंत्रज्ञान,आर्थिक सहाय्य आणि मार्केटिंगची सुविधा उपलब्ध करून दिल्यास शेतकरी कर्जमुक्त होऊन चांगले उत्पन्न मिळवू शकेल.

    तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मतांबद्दल कमेंट मध्ये आम्हाला कळवा.शेतकऱ्यांसाठी आणखी उपयुक्त माहिती तुम्हाला Marathipride.com या वेबसाईटवर वाचायला मिळेल.त्यासाठी खाली दिलेल्या व्हाट्सअप चिन्हावरती क्लिक करून आमचा Marathipride.com हा ग्रुप जॉईन करा.

    LEAVE A REPLY

    Please enter your comment!
    Please enter your name here

    Latest Posts

    spot_imgspot_img

    Don't Miss

    Stay in touch

    To be updated with all the latest news, offers and special announcements.