Adhik mas Amavasya 2023 : Know Significance of Tithi, Snan, Daan Muhurta
आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये अधिकमासाला खूप जास्त महत्त्व दिले जाते. कारण अधिक महिना हा अत्यंत शुभ मानला जातो या महिन्यात केलेले दान खूप जास्त चांगले फळ देतात अशी धारणा आहे. अधिक महिना हा प्रत्येक 3 वर्षांनी येतो या महिन्यात मुलगी आणि जावयाचे काही तर वाण देऊन त्यांना ओवाळतात कारण मुलगी आणि जावई म्हणजे लक्ष्मी नारायणाचा जोडा असतो असे मानले जाते. अधिक महिन्यातल्या प्रत्येक दिवसालाच खूप महत्त्व असते आणि प्रत्येक दिवस हा शुभ आहे असं मानलं जातं. या महिन्यात केलेले धार्मिक विधी, पूजा पाठ यांचे अधिक चांगले फळ मिळते. तसेच अधिक महिन्यात पौर्णिमा, द्वादशी आणि अमावस्या याला विशेष महत्त्व दिले जाते.
2023 मध्ये 1 ऑगस्ट – अधिक श्रावण पौर्णिमा.
13 ऑगस्ट – द्वादशी.
16 ऑगस्ट – अधिक श्रावण अमावस्या.
17 ऑगस्ट पासून मुख्य श्रावण महिना सुरू होतो.
आपण या ब्लॉगमध्ये पाहणार आहोत अधिक मासातील अमावस्याचे महत्त्व आणि या दिवशी कोणते दान करावे.
अधिक मास अमावस्या चे महत्व-
अधिकमासात व्रत,पूजा,उपासना, दान केल्यानंतर मनुष्याला सुख शांती व समाधान लाभते असे मानले जाते. मनातील इच्छा पूर्ण होतात. मोक्षप्राप्ती होऊन जीवनाचे सार्थक होते. ज्या घरात व्रत, नियम पाळले जातात तेथे देव-देवता चा वास असतो. त्यामुळे तेथील दुःख, संकटे,विघ्न यांचे निवारण होऊन त्या घरात सुख, समृद्धी,ऐश्वर्य, संतती, सौख्याने भरून जाते. म्हणून त्यागाचे आणि भक्तीचे महत्व सांगणाऱ्या या अधिक महिन्यात आपण देखील शक्य असेल तेवढे दान आणि पूजा करून अधिकाधिक फळ मिळवले पाहिजे.
हे सुद्धा वाचा
सलोखा योजना सुरू – आता शेतजमिनीचे वाद मिटणार
अधिक मासातील अमावस्येला केलेल्या उपायांमुळे पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पिंडदान, श्राद्ध इत्यादी करता येतात. जसे की अधिक मास हा दर 3 वर्षातून एकदा येतो तसेच अधिक मास अमावस्या ही देखील 3 वर्षांनी एकदा येते. अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने पुण्य मिळते. या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्याच्या मुळाशी जल अर्पण करून तेथे दिवा लावल्याने पितृदोष नाहीसा होतो तसेच पित्र आणि देवता प्रसन्न होतात. या दिवशी अन्न, वस्त्र तीळ, आदी दान करावे.
2023 मध्ये अमावस्या वेळ मंगळवार 15 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजून 42 मिनिटांनी सुरू होत आहे ते दुसऱ्या दिवशी 16 ऑगस्ट दुपारी 3 वाजून 7 मिनिटांपर्यंत आहे.
16 ऑगस्ट रोजी पहाटे 5 वाजून 51 मिनिटांनी ते सकाळी 9 वाजून 8 मिनिटापर्यंत तुम्ही स्नान आणि दान करू शकता. या दिवशी ब्रह्म मुहूर्त पहाटे 4 वाजून 24 मिनिटांनी ते 5 वाजून सात मिनिटापर्यंत आहे.
पितृदोष पूजा आणि दान कधी करावे?
सकाळी 10 वाजून 47 मिनिटांनी ते दुपारी 12 वाजून 25 मिनिटापर्यंत तुम्ही पितरांची पूजा करण्याची वेळ आहे. पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी पिंडदान,श्राद्ध, ब्राह्मण भोजन, दान,पंचबली कर्म इत्यादी या अमावस्येला केले जातात. हे पितृदोष उपाय अधिकमास अमावस्येच्या दिवशी सकाळी 11.30 ते 2.30 या वेळेत करावेत.
तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला Comment मध्ये नक्की सांगा.अशाच नवनवीन माहितीसाठी खाली दिलेल्या चिन्हावरती क्लिक करून आमचा marathipride.com हा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.